52 Views

दुर्दैवी अंत….!
✍️ २३१२

विनोदकुमार महाजन
——————————–
रविंद्र महाजनी….
उमद व्यक्तिमत्व.
तगडा अभिनय.
सर्वांना हवहवस वाटणार अन् भुरळ घालणार प्रभावी व्यक्तित्व !

त्यांचा असा भयंकर अंत व्हावा ?
त्यांचा मृत्यु काळजाला चटका लावून गेला.

अख्खा महाराष्ट्र अन् देशही हळहळला असेल त्यांच्या मृत्युने.

खरंच नियती एवढी क्रूर असते का हो ?
एका लोकप्रिय व्यक्तिचा असा शेवट व्हावा ?

मुळात प्रश्न असा आहे की,ते आपल्या कुटुंबापासून दूर जाऊन, एकटे अन् एकाकी जीवन का जगले ?
अस कोणत दु:ख होतं त्यांना ?
कोणती सल होती त्यांच्या मनात ?
जी जगाला शेवटपर्यंत समजू शकली नाही ?

रवींद्र महाजनींच अस विपर्यस्त जीवन बघितलं म्हणजे खरंच मनाला चटका लागतो.
अन् अस वाटत की किती रवींद्र महाजनी असे समाजात आहेत, जे अस एकाकी जीवन जगत आहेत ?

चूक कुणाची ?
त्यांची स्वत:ची ?
परिवाराची ?
की सामाजिक रचनेची ?

खरंच कांहीं ही कळत नाही हो.समाजाला नेमकं काय झालंय ? असं आक्रीत विक्रीत समाजात का घडतंय ?

खरंच माणूसपण खुज झालं ?
माणूस छोटासा झाला ?
अन् कलियुगात खरंच पैसा मोठा झाला ? पैसा सर्वस्व झाला ?
कलियुगातील देव म्हणजेच पैसा ?

खरंच असं अजब गजब गणित कसं झालं ? कोणी केलं ?
आज माणूस माणसापासूनच का दुरावतो आहे बरं ?

अनेकांच्या नशीबी आज असं एकलकोंड जगणं का बरं येत आहे ?

सुसंस्कृत समाज आज असा विचित्र, विक्षिप्त, स्वार्थी, ढोंगी, लालची का बरं अन् कसा झाला ?
आहे उत्तर कुणाकड ?

आदर्श एकत्र कुटुंब पध्दती बुडाली.
ठीक आहे.
अहो पण ,जी चार दोन नाती आहेत, त्यांच्यातील ही आत्मीयता संपली ?

का बरं ?
खरंच माणूस हा माणूस राहिलाच नाही ?
भावनाशून्य हाडामासाचा गोळा ?

प्रेम, संवेदना, आत्मीयता, आपुलकी, स्नेह खरंच समाजातूनच गायब झालंय ?

अहो घरोघरी मातिच्याच चुली आहेत.( आता चुली गेल्या, अन् गँस आले हाच काय तो फरक )
पण जवळजवळ प्रत्येक घरातूनच अस भयंकर विदारक चित्र आज समाजामध्ये दिसतं आहे.

माणूस एकाकी, एकलकोंडा, एकटा का पडतो आहे ?
त्याच सुखदुःख जाणून घ्यायला अथवा ओळखालाही जवळ कुणीच नसावं ?
आश्चर्य आहे .

विशेषतः शहरी भागातील हे भयानक अन् विदारक चित्र बघितलं की गुदमरून येतं.काळजाची कालवाकालव होते ?
खरंच कुठ चाललाय मनुष्य ?

निदान आज खेडी तरी बरी आहेत म्हणायचं.तीथ अजूनही शेजार धर्म वास्तवात आहे.

अहो, परदेशी पैसा मिळवायला गेलेली पोरं , आईबाप मेले तरी बघायला यायला तयार नाहीत ?

आईबाप व्यसनी आहेत, मानसिक छळ करणारे आहेत,
असं असेल तर ठीक आहे ना ?
नका येऊ त्यांना भेटायला .
पण ज्यांनी हाडांची काडं करून, शिकऊन परदेशात पाठवलं ,त्यांना तरी नका विसरू ना रे बाबांनो.

पुर्वी एकत्र कुटुंब पध्दतीतून ,कुणी स्वार्थांधतेने वेगळा रहायला लागला, तर शरीराचेच दोन तुकडे झाल्यासारखं वाटायचं.

अन् आज ?
कुणी घरात एकटा मरून पडला, अन् त्याची दुर्गंध सुटली तरी बघायला कुणी नसावं ?
पाणी पाजायला जवळ कुणी नसावं ?

कुठ चाललाय समाज ? अन् कुठ चाललंय समाज मन ?
आहे उत्तर कुणाकडं ?

माझं,तुझं,त्याचं,धन,दौलत,वैभव,पैसा…
या सा-यापाई एवढा अट्टाहास ?
अन् एवढ्यापाईच नातीगोती ही समाप्त ?

काय झालंय माझ्या समाजाला ?
कुठ आहेत माणसाची काळजं ?
ह्रदय ?
माणूसच माणसाला विसरला.
का बरं असं झालं.
बाबानों विचार करा.

माझा एक खेड्यातील मित्र मला म्हणतो,
” अरे मेलं तरी माणसं आता कुणी रडत नाहीत ! ”
खरंच खरंय का हो हे ?
खरंच माणूस एवढा निष्ठुर झाला ?

कशासाठी ?
कुणासाठी ?
चार पैशासाठी ?
की श्रीमंतीसाठी ?

अहो, पण पैशानंच सगळं नसतं हो मिळत.
पैशान देव विकत मिळतो का ?
दहा हजार कोटी रूपये टाकून बघा बरं ,देव विकत मिळतो का ते ?
मग माणूसच असा भयंकर विचित्र अन् विक्षिप्त का बरे झालाय ?
आहे उत्तर कुणाकडं बाबांनो ?

तर्हेवाईक समाज, तर्हेवाईक अन् विक्षिप्त माणसांचं प्रमाण का बरं वाढतयं दिवसेंदिवस ?
जबाबदार कोण ?

खरंच जबाबदार कोण ?
शोधा उत्तर शक्य असेल तर.

नसता,
कालाय तस्मै नम:
असं म्हणून द्या विषय सोडून.

काय मित्रांनो ?
पटतंय का माझं म्हणणं ?

हरी ओम्

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!