17 Views

*पाय ओढणे*
✍️ २४७१

*विनोदकुमार महाजन*

🤔🤔🤔🤔🤔

आमच्या हिंदू धर्मात साधारणतः एक गोष्ट खूपच प्रकर्शाने जाणवते.
एकमेकाचे पाय ओढणे.
एकमेकाप्रती कागाळ्या , द्वेष ,मत्सर , निंदा नालस्ती एवढी भयंकर टोकाची करतात की एखाद्याच जगणचं असह्य व्हावं.

पराचा कावळा करायचा अन् बदनामीच सत्र आरंभून एखाद्याच जगणंच मुश्कील करायचं.
एखाद्याचा मानसिक छळ करून त्याला अगदी पार वेड करायचं.
अन् एवढ्यावरच थांबायच नाही तर त्याला वेडा बनवून पुन्हा वर भयंकर मानसिक छळ आरंभ करायचा.त्या वेड्याला सुध्दा सुखाने जगू द्यायच नाही.

*त्यालाही दगडं मारायची*
अन् हसत मजा बघत बसायची ?

*कसली मानसिकता आहे ही ?*

*काय कारण असाव कळत नाही*
पण हे विष ब-याच ठिकाणी बघायला मिळते.

एखादा पुढे चालला , नावं , प्रतिष्ठा ,पैसा कमवायला लागला की त्याला नामोहरम करणं , त्याला जास्तीत जास्त बदनाम करणं , त्याच्या पायात पाय घालून तोंडघशी पाडणं ,
पराचा कावळा करून एखाद्याला भयंकर बदनाम करून त्रस्त करणं , शहानिशा न करताच एखाद्याच आयुष्य उध्दस्त करणं
हे असले प्रकार ब-याच वेळा , ब-याच ठिकाणी बघायला मिळतात.

एखादा धर्म कार्य करतो आहे , ईश्वरी कार्य करतो आहे तर त्याच्या पाठीशी आपली शक्ती उभी करावी , त्याला खंबीर आधार द्यावा , त्याच्या दुखा:त सहभागी व्हाव
असं वागायचं सोडून उल्टा त्यालाच बदनाम करायचं , तोंडघशी पाडायचं , ढसढसा रडवायचं , त्याच्या वाईट काळात जास्तीत जास्त तो कसा संपला जाईल , यासाठी पध्दतशीरपणे व्यूहरचना करायची…
असे चित्र सर्रास बघायला मिळतं.

वैतागून एखादा कायमचा दूर निघून गेला , तरीसुद्धा त्याच्याविरुद्ध अखंड कटकारस्थाने करायची ?
दूर राहुनही तो सुखात जगला नाही पाहिजे अशी योजना आखायची ?

*किती कमालीचा द्वेष मत्सर*? असतो एखाद्याच्या पोटात.??

( एखाद्याला *सिध्दी* प्राप्त झाल्या तर त्याला दूरच ही सगळं दिसत , ऐकू ही येतं … असो )

अहो आमच्या हिंदू धर्मात मोठमोठ्या सिध्दपुरूषांना , महापुरूषांनाही कच्चा सोडलं जात नाही. इतिहास साक्षी आहे.
तिथे *तुम्ही आम्ही कोण* आहोत ?

कांहीजणाचा तर आजन्म वसाचं असतो …
तो म्हणजे ?
जातीय सलोखा वाढवून धर्म कार्य वाढवायचं सोडून , जातीय द्वेष मत्सर पेटवायचा.? तो पण भयंकर टोकाचा.?

*वणवा पेटवून* मजा बघत बसायची.?

असल्या अनेक भयानक कारणामुळे *आमच्या धर्माची* भयंकर आणि अपरिमित हानी झाली आहे. तरीही आम्ही सुधरायला तयार नाही आहोत.??

असलं वागणं *बरं नव्हं* बाबांनो.

धर्म कार्यात , संकटात एखाद्याला आधार द्या अथवा न द्या.
पण कमीत कमी त्याला त्रास तरी देऊ नका.?त्याच जगण तरी मुश्कील करू नका.?त्याचा मानसिक छळ तरी करू नका.?त्याला ढसढसा रडवू तरी नका.?

*पटतंय का बघा ?*

आज धर्म रक्षणासाठी सर्वांनी एक होण अत्यंत आवश्यक आहे.
*कारण धर्म संकट मोठं आहे.*

शिवरायांच *हिंदवी स्वराज्य* निर्मितीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी
अठरा पगड जाती एक होऊ या.
आपसी कलह , मतभेद ,मनभेद विसरू या.
सर्व धर्मीयांना प्रेमाने हिंदुत्वाशी अन् ईश्वरी सिध्दांताशी जोडू या.

*देशावर अन् जगावर भगवंताचा* 🚩🚩🚩
*भगवा झेंडा डौलाने फडकवू या.*

हिंदवी स्वराज्य निर्माते
*शिवाजी महाराज की जय.*
ही गर्जना करून आसमंत दणाणून सोडू या.

हर हर महादेव

🚩🚩🚩🚩🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!