213 Views
जीवनाचे तत्वज्ञान !!
( मौलीक विचार धन !! )
🩷🩷🩷🩷🩷🩷🩷
काळ उलटला की ?
खेळ उलटतो अन् ?
आयुष्यात सगळंच ?
उलटंतीलटं घडतं !
म्हणून ? दुस-याच्या
आयुष्याशी खेळू नका !
नियती अन् नशीब फार
क्रूर असते !
ती भल्याभल्यांनाही ?
लोळवते !
अन् ? सगळेच हिशोब ?
पूर्ण करते !
म्हणूनच रावणाची सोन्याची ?
लंकाही जळाली !
अन् उन्मादी दुर्योधन ,
कँस , हिरण्यकश्यपू यांचा
क्रूरपणाने ईश्वरी शक्तिकडूनच
वधही झाला !
म्हणूनच भजून खाणे
नेहमी फायद्याचे !
अती उतमात आणी
अती मस्ती , अती माज ,
कपट , ढोंग ,
दुस-याच्या आयुष्याशी ?
खेळणं….?
एक दिवस सगळंच
नियती
संपवल्याशिवाय ?
रहात नाही !
सर्वनाश !
ही उन्मादी , हाहाःकारी
उन्मत्त महापातक्यांना
अंतिम चेतावणी आहे !
पापाचे घडे भरले की ?
सगळेच खेळ खल्लास
होतात !
म्हणूनच शालिनता , नम्रता
सेवाभाव इत्यादी ईश्वरी
गुणसंपन्न बनून आयुष्य ?
मस्त मजेत घालवावं !
परोपकारी वृत्तीनेच
निरंतर जगावं !
भगवंतावर , जगावर
भरभरून प्रेम करावं !
अन् ?
निस्वार्थ प्रेम करूनही ?
धोकाच झाला तर ?
अशा घातखोराचं ?
आयुष्याचचं ?
नातं संपवून ?
मस्त आनंदाने जगावं !
हेच आनंदी जीवनाचं
सूत्र आहे !
जय हरी विठ्ठल !
रामकृष्ण हरी !
जय श्रीकृष्णा !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विनोदकुमार महाजन