11 Views

माझे सुखी आयुष्य https://globalhinduism.online/?p=5888

*आजपासून माझे ?*
*सुखी आयुष्य चालू* *झाले…!!!*
✍️ २९०२

*विनोदकुमार महाजन*

✅✅✅🌹

होय मित्रांनो ,
आजपासून माझे सुखी आयुष्य चालू झाले…
असे दररोज अगदी न चुकता आपल्या मनाला सांगा.
संपूर्ण युनिवर्स , अदृश्य ईश्वरी शक्ती तुम्हाला त्यासाठी भरभरून शक्ती देतील.

माझे सगळे दुःख आजपासून जळून भस्म झाले आहे , मी संपूर्ण पणे सुखी , समाधानी , आनंदी झालो आहे , असे आपल्या मनाला सांगा आणी चमत्कार बघा.
अगदी आश्चर्य कारक पणे तुमचे प्रश्न सुटायला लागतील आणि दस दिशांनी तुम्हाला भरभरून यश , समृध्दी , लौकिक मिळायला सुरूवात होईल.

मनाचा संकल्प व इच्छा शक्ती यामध्ये खरेच खूप सामर्थ्य असते हा माझा स्वानुभव आहे.
सोबतीला आध्यात्मिक साधनेची व जनकल्याणासाची जोड दिल्यास तुमचे यश अगदी सोपे होऊन जाईल.

अनुभव घेऊन पहायला काय हरकत आहे ?
*जय हरी विठ्ठल*

🌹🌹🌹✅

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!