30 Views

परीक्षा…!!! https://globalhinduism.online/?p=5920
*थंड डोक्याची अचूक* *रणनिती…!!*
✍️ २९१६
*विनोदकुमार महाजन*
🚩🚩🚩✅
जीवनात चौफेर यशासाठी व प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळवण्यासाठी , अपेक्षित परिणाम मिळण्यासाठी ब-याच वेळा अपेक्षित वेळेची प्रतिक्षा करणे जसे हितकारक असते तसेच थंड डोक्याने घेतलेले निर्णय सुध्दा अपेक्षित परिणामापर्यंत घेऊन जातात.ब-याच वेळा ह्रदयाचे न ऐकता अर्थात भावनेच्या आहारी न जाता , मेंदुने ते सुध्दा गरम नव्हे तर थंड मेंदुने घेतलेले निर्णय खूप महत्वपूर्ण ठरतात.
ब-याच वेळा जीवनामध्ये असे चक्रव्यूह येतात अथवा शत्रू पक्षाकडून टाकले जातात की , आता सगळे काही संपले आहे असे वाटते.संयम आणि धैर्य ठेवून समोरच्या चक्रव्यूहाचा संपूर्ण अभ्यास करून , ते भेदन करण्याची व त्यातून यशस्वी पणे बाहेर पडण्याची अचूक रणनिती बनवली तर हमखास पणे चक्रव्यूह भेदन करून , अपेक्षित परीणामापर्यंत नक्कीच पोचता येते.
आज देशातील स्थिती अशीच चक्रव्यूहा सारखी आहे.आरक्षण हटाव , आरक्षण बचाव या गंभीर समस्येमध्ये देश अडकतो की काय आणि विकास कामांना खीळ बसते की काय ? अशी भयंकर विचित्र परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झाली आहे.
देश विघातक शक्तींना यामुळे अनायासेच बळ मिळणार आहे.व देशाला यशाच्या चौफेर व विकासाच्या परमोच्च शिखरावर घेऊन जाण्याच्या ईश्वरीय कार्यात अशा देश विघातक शक्ती नक्कीच वायु वेगाने सक्रिय होणार आहेत.
अशावेळी अचूक रणनिती द्वारा थंड डोक्याने घेतलेले निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहेत व या विनाशकारी चक्रव्यूहातून देश सहिसलामत बाहेर पडणार आहे.
या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी एक जबरदस्त शक्तिशाली रणनिती व अद्भूत अदृश्य ईश्वरी कवच घेऊनच मैदानात उतरावे लागणार आहे.
तेंव्हाच अपेक्षित यश व परिणामांपर्यंत पोचता येईल.
सत्याला नेहमी अनेक अग्नी परीक्षा देऊनच उत्तीर्ण व्हावे लागते.
त्यासाठीच कृष्ण निती महत्वपूर्ण ठरते.
*जय श्रीकृष्ण*
🕉️🚩🪷✅
