278 Views

*शेगांवला एकदा जावून* *या…*
✍️ २७५९

🕉️🕉️🕉️🕉️🕉️

*गण गण गणात बोते*

महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव , एक स्वर्गतूल्य आनंदी देवस्थान आहे , जिथे कल्पतरू , संजिवनी गजानन महाजांचे वास्तव आपल्याला पावलोपावली जाणवते.

गजानन महाराज आजही ख-या भक्तांना चमत्कार दाखवतात व संकटात धावून येतात , हा माझा स्वतःचा अनुभव आहे .

इथली शिस्त , स्वच्छता , टापटीप , निटनेकपणा , सेवकांची , कर्मचा-यांची नम्रता , शालिनता , भ्रष्टाचार मुक्त सेवाकार्य , हे सगळे बघून , खरेच आपणास असे वाटते की आपण खरोखरीच गजानन महाराजांच्या सानिध्यात व प्रत्यक्ष स्वर्गात आहोत .

विशेषतः आपल्या अनेक तीर्थक्षेत्रावरील भयंकर भ्रष्टाचार , बजबजपुरी व घाणीचे साम्राज्य पाहून आपले मन दु:खी होते , मनाला एक खंत लागते , आणि मनात साहजिकच विचार येतो ,

” *हाच का धर्म ? “*
*की भयावह धर्म ग्लानी* ??

म्हणूनच ज्या तिर्थक्षेत्रावर , मंदिरात भ्रष्टाचार आहे ती सर्व मंदिरे फक्त हिंदू बोर्ड स्थापन करून त्यांच्या ताब्यात द्यायला हवीत.

विशेषतः आज धर्माचे व आध्यात्माचे जे बाजारीकरण होते आहे , त्याला यामुळे आळा तर बसेलच . पण खरे मंदिर व्यवस्थापन कसे करायचे असते ते , शेगावच्या आदर्श उदाहरणावरून लक्षात येईल.

*असो .*

माझ्या कुटुंबाचे मागे कांहीं (अज्ञात …) कारणास्तव भयंकर संकटे लागली होती.

यातून सुटण्यासाठी मी जवळजवळ एक महिना एका गुप्त ठिकाणी जाऊन कांहीं साधना , होमहवन, मंत्रजप केले.
माझ्या घरी घरच्या सगळ्या सदस्यांकडून होमहवन करवून घेतले.
माझ्या गावी , शेतात जाऊन मी स्वतः होमहवन केले.
अलखनाथ बापूंनी पुर्वजांच्या शापातून मुक्ती होण्यासाठी कांहीं तांत्रिक क्रिया व नाथसांप्रदायातील हवन करवून घेतले.

त्यानंतर पुन्हा मी एका ठिकाणी जाऊन कांहीं तांत्रिक उपाययोजना करून , घरामध्ये हवन केले.
( भविष्यातील अनेक विघ्ने , संकटे मला माझ्या दैवी शक्तिने आधीच जाणवतात.त्यामुळे त्यावरील योग्य उपाययोजना मी आधीच करून टाकतो. )

सगळे पूर्ण झाल्यानंतर मला माझी मुलगी स्वतः होऊनच म्हणाली आपण सगळे शेगांवला गजानन महाराजांच्या दरबारात जाऊन येऊ या.विशेष म्हणजे कांहीं दिवसांपासून मी ही हाच विचार करत होतो.

आम्ही सहकुटुंब शेगांवला आलो.
आलो नाही तर प्रत्यक्ष गजानन महाराजांनीच आम्हाला बोलावून घेतले.त्याशिवाय असा योग कसा येणार ?

मी मागे गजानन महाराजांचा,
*गण गण गणात बोते*
हा गजानन महाराजांचा सिध्दमंत्र दोन कोटी जप पूर्ण केला आहे.

मला एकवेळ प्रत्यक्ष गजानन महाराज स्वप्नात आले ,
त्यावेळी बाबांना मी म्हणत होतो ,
” बाबा , मला हे जगातील भयंकर अंध:पतन बघवत नाही , त्यापेक्षा मृत्यू बरा वाटतो.माझ्या हातून कांहीं तरी महान ईश्वरी कार्य व्हावे ही इच्छा आहे.”

त्यामुळे गजानन बाबांनी दोन्ही टाचा उंच करून , दोन्ही हात उंच करून , मोठ्या आवाजात मला म्हणाले , ” फार मोठ्ठे नांव कमावशील .”

पुन्हा थोडे दिवस गेले ,
बाबांनी पुन्हा स्वप्नात येऊन माझ्या डोक्यावर उजवा हात ठेऊन सांगितले ,
” *तुझे कार्य सुरू झाले* *आहे .”*
विशेषतः हा लेख गजानन महाराजांच्या शेगांव येथे व त्यांच्याच समोर लिहीतो आहे.

माझ्या पत्नीनेही गजानन महाराजांच्या
*गजानन विजय*
या ग्रंथाची अनेक पारायणे केली आहेत.व तीलाही बरेच दिवसांपासून शेगांवला जाण्याची इच्छा होती.

माझ्यासारखे अनेक अनुभव अनेक भक्तांना इथे नेहमीच येत असतात हे विशेष.

विशेषतः पृथ्वीवरील भयावह नरक पाहून , ब-याच जणांना स्वर्गाला पळून जावे वाटणे साहजिक आहे.
अशावेळी दैवी शक्ती , दिव्य शक्ती नक्कीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते व वारंवार आपल्याला मार्गदर्शन करून , निरंतर पुढील रस्ता दाखवत राहते.
( देव सगळा एकच आहे व सगळी दैवी शक्ती एकच असते , फक्त अवतार कार्यासाठीची त्यांची रूपे वेगवेगळी व तत्कालीन असतात. )

फक्त आपला विश्वास , श्रध्दा, ईश्वरावरील दिव्य प्रेम हवे म्हणजे दिव्य अनुभूती मिळते व दिव्यत्व ही प्राप्त होते.

सनातन धर्माच्या वैश्विक कार्यासाठी व अपेक्षित यशासाठी अनेक देवी देवतांच्या आशिर्वादाची व सिध्द पुरूषांच्या वरदहस्ताची गरज असते.
अनेक काळच्या खडतर तपश्चर्या करून ती साध्य करता येते हे स्वानुभव व खात्रीने नमूद करतो.

शेगांवी मी आज बाबांना हेच सांगीतले आहे.

आपण ही एकवेळ वेळ काढून शेगावला जरूर जाऊन या.व तिथला उच्च कोटीचा स्वर्गीय आनंद घेऊन या.

*जय गजानन माऊली*
*गण गण गणात बोते*

*विनोदकुमार महाजन*
( *बापू )*

*आनंद विहार*

🙏🙏🙏🕉️🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!