non gamstop casino uk chicken road aviator non gamstop casino chicken road तुम्ही तेजस्वी लक्ष्मी पूत्र - GlobalHinduIsm
159 Views

*लक्ष्मी पूत्र*

माझा जन्मच विजयादशमीची आदली रात्र नवमीचा आहे.खंडेनवमी.
शस्त्रपूजन दिवस.सिध्दीदात्री अर्थात साक्षात महालक्ष्मीचा पूत्र.त्यामुळे तिचेच धगधगते तेज माझ्यात आहे.
त्यामुळे आजवरच्या जीवनाच्या लढाईत मी केवळ जींकतच आलो आहे.हार मला कधीच माहिती नाही.आणी इथून पुढेही जींकतचं राहणार.
ती साक्षात रणचंडीच माझी आई आहे , तीच माझी अहोरात्र काळजी करते तर मग मी कसा हरणार ? प्रसंग कितीही महाभयानक आणी बिकट असला तरी सुध्दा मी जींकलेलोच आहे.

नवमी म्हणजे ९ अंक , पुर्णत्वाचे प्रतिक.नवगुणांची ईश्वरी उधळण.
त्यामुळे प्रत्येक कार्यात अग्रेसर , हा माझा स्वभाव.

आपण सगळे सनातनी सुध्दा माता महालक्ष्मीचेच तेजस्वी पूत्र.पण आपणालाच जर देवी देवतांचा , आपल्या आईचा , आपल्या ईश्वर निर्मित आदर्श संस्कृतीचा विसर पडला तर त्यात दोष कुणाचा ? आपला की आपल्या आई महालक्ष्मीचा ? धधगते ईश्वरी तेज आपल्यात असताना आपण आक्रमणका-यांचे आजन्म गुलामच राहणार असू तर ? आपल्यासारखे कर्म दरीद्री आपणच ना ?
अमृताचे कूंभ भरलेले असताना तेजस्वी हिंदू पूत्र भीक मागून जगतो ? याला काय म्हणावे ?

उठा , वैश्विक नवक्रांती साठी सिद्ध व्हा.

वैश्विक महाक्रांती अभियान व विश्व स्वधर्म सुर्ये पाहो हा देखील त्याचाच भाग आहे.
आणी यातही मी आणी आपण सगळे जींकणारच आहोत हा विश्वास ठेवा..
आणी ते यशही आता दृष्टिपथात आहे.

कुणाला ही अतीशयोक्ती वाटली तर खुशाल वाटो.
*निंदकाचे घर असावे* *शेजारी.*

कोल्हापूर निवासिनी जगत् जननी माता *महालक्ष्मी की त्रिवार* *जयजयकार.*

*विनोदकुमार महाजन*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!