67 Views

*इच्छा तीथे मार्ग*
✍️ २८११

पोटात भूक असेल तर
शिळी भाकरी अन् चटणी सुध्दा गोड लागते.
पण पोटात भूकच नसेल तर पंच पक्वान्न ही नकोसे वाटतात.

डोळ्यात झोप असेल तर शेतातल्या मातीवरही झोप लागते.
पण डोळ्यात झोपच नसेल तर गाद्या गिरद्यावर तरी झोप कशी लागेल.?

मनात इच्छा असेल तर अवघड कार्य सुध्दा सोपे होते.
पण मनात इच्छाच नसेल तर सोपे कामही करायला जड जाते.

मनात ओढ असेल तर ईश्वर सुध्दा भेटतो.
पण मनात भावच नसेल तर ईश्वर तरी काय करणार ?

इच्छा असेल तर नक्कीच मार्ग सापडतो.
पण इच्छाच नसेल तर
मार्ग तरी कसा काय सापडेल ?

*विनोदकुमार महाजन*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!