83 Views

*देवा , तु मला पाहीजे…!*
✍️ २८५८
*विनोदकुमार महाजन*
🙏🙏🙏🙏
देवा …
तु मला पाहीजे.
खरंच रे देवा , तुच मला पाहीजे.
सुख असो अथवा दुःख ,
श्रीमंती असो अथवा गरीबी,
तु मला पाहीजे.
देवा मला तु कांहींही नाही दिलंस तरी ?
तुच मला पाहीजे.
यश नको , किर्ती नको , धन नको , वैभव नको ,
तुझे चरण मला पाहीजे.
देवा तु मला पाहीजे.
दु:खाचे डोंगर असो ,
जीवनाची कठीण परीक्षा असो ,
तु कशातच साथ नाही दिलीस तरी चालेल पण ?
देवा मला तु पाहीजे.
तुझं निरंतर , निर्व्याज , पवित्र , शुद्ध प्रेम मला पाहीजे.
जन्मोजन्मीच , कधीही न तुटणारं , कधिही भंग न पावणारं , तुझं माझं घट्ट नातं मला पाहीजे.
देवा तु मला पाहीजे.
मी तुझ्यावर रूसलो , रागावलो , तुझ्यावर मी प्रेम नाही केलं , तुला चिडवलं तरीही ?
देवा तु मला पाहीजे.
जन्मोजन्मी तु मला पाहीजे.
जगन्मिथ्या..ब्रम्हंसत्य..
हेच अंतिम सत्य आहे रे देवा…
म्हणूनच देवा तु मला पाहीजे.
देवा तु मला पाहीजे.
वेडी माणसं ?
कितीही प्रेम केलं तरी
साथ सोडतात…
स्वार्थ नाही साधला की ?
दूर निघून जातात.
पण देवा ?
तु तर या सगळ्याच्या पलीकडे असतोच.
रूसलं रागावलं तरी तु ?
प्रेमच करतोस.
अगदी आईसारखं…
निष्पाप , निरपेक्ष…
म्हणूनच देवा तु मला पाहीजे.
खरंच सांगा…? आपल्यालाही कुणी असं खरंखुरं प्रेम करणारं जगात कुणी भेटेल का हो ?
मला फक्त तु पाहीजे ,
मला तुझं कांहीं कांहीं नको…
फक्त मला तुझं प्रेम पाहीजे आणी ?
फक्त तु पाहिजे…??
असं म्हणणारं आणी खरं ईश्वरी प्रेम करणारं कुणी भेटेल का हो ?
खरंच कुणी भेटेल का हो ??
*श्रीहरी…*
🙏🙏🙏🙏
