9 Views

*बाळा , जातील हं दिवस*
✍️ २८७२

*विनोदकुमार महाजन*

🩷🩷🩷🩷

ज्या वेळी आपण खूप
दुःखात , संकटात , अडचणीत असतो तेंव्हा आपल्या आईचे दोन आधाराचे शब्द किती महत्वाचे आणी लाख मोलाचे असतात बरं ?

संकटकाळात आपली आई वात्सल्याने आणी मायेने डोक्यावरून , पाठीवरून हात फिरवते आणी म्हणते…
” *बाळा , जातील हं हे ही* *दिवस.काळजी* *करू नको.सगळं* *व्यवस्थित होईल . “*

अगदी करोडो रूपये देऊनही असे आधाराचे , मायेचे चार शब्द मिळतील का हो या जगात ?

म्हणूनच आई ही आईच असते.
अगदी फुटक्या तुटक्या झोपडीतही आणी भाजी भाकरीतही ? मायेच्या उबेची आणी आधाराच्या दोन शब्दांची खरंच किती ताकद असते बरं.

जग जींकण्याची उर्मी ही ह्या प्रेमात असते.
आणी सगळी स्वर्गीय सुखेही आईच्या प्रेमापुढे फिकी असतात.
म्हणूनच म्हणतात ना ?
” *स्वामी तिन्ही जगाचा* *आई विना* *भिकारी…”*

एक जुनी म्हण आहे…
बघा आपल्याला त्याचा अर्थ बोध होतोय का ते ?

” आंस का बाप , निरास की माॅं , होते की बहन , जोरू साथ , पैसा गाॅंठ , निदान का दोस्त…”

*माता महालक्ष्मी की जय*

🙏🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!