31 Views

नशीबाच्या फे-यातून सुटका ? https://globalhinduism.online/?p=5876

*नशीबाच्या फे-यातून* *सुटका होईल* *का…??*
👆✍️ २८९८

*विनोदकुमार महाजन*

✅✅✅🕉️

प्रश्न अगदी सोपा आहे..
आणी सहज पण , प्रत्येकाच्या मनातील आणी जीव्हाळ्याचा.
काय ? खरंच नशीबाच्या फे-यातून सुटता येईल काय ❓

उत्तर आहे…
होय , अगदी नक्कीच नशीबाच्या फे-यातून सुटता येईल.
याची मी खात्री देतो.
कारण ?
अथक प्रमत्नवादाने व खडतर तपश्चर्येने मी माझ्या अती भयावह व असह्य नशीबाच्या फे-यातून , माझ्या सद्गुरू अण्णांच्या कृपेने व परम ईश्वरी कृपेने खरोखरीच सुटलो आहे .
भयावह अती असह्य जीवन व असह्य तडफडीतून मी आज मुक्त झालो आहे व मला हव्या असणाऱ्या दिव्य धेयाच्या अगदी जवळ पोचलो आहे.

आत्मकल्याण तर झाले आहेच.पण इथून पुढचे जीवन म्हणजे सत्य व धर्म यांचा वैश्विक अंतिम विजय व जे अडलेले नडलेले सत्यवादी आहेत त्यांना निरपेक्ष वृत्तीने योग्य मार्ग दाखवून त्यांना दु:ख मुक्त व संकट मुक्त करून, दिव्यत्वाच्या ईश्वरी प्रवाहामध्ये ओढून आणने व वैश्विक कार्यास गती देणे.

आता दु:ख मुक्त व संकट मुक्त होण्यासाठी काय करता येईल यावर थोडे विश्लेषण करू.

दुःख प्रत्येकाला भोगावेच लागते का ?
होय दुःख प्रत्येकाला भोगावेच लागते.
त्याची तीव्रता कमी जास्ती असू शकेल.
अगदी स्वतः ईश्वर जरी दिव्य देह धारण करून मनुष्य रूपाने धरतीवर अवतरला तरीसुद्धा त्याला ही दु:ख भोगावेच लागते.

जेवढे अवतार कार्य मोठे तेवढे दु:ख अती भयावह व असह्य असते. आणी यातून कुणाचिही सुटका नाही.

मग दु:खमुक्त होण्यासाठी काय करावे ?
सत्याच्या मार्गाने अखंड ईश्वरी चींतन , हा दु:ख मुक्त होण्याचा राजमार्ग होय.

दुःख भोगत असताना दृश्य शक्ती बरोबरच अदृश्य शक्ती सुध्दा त्रास देऊ शकतात का ?
होय…
अगदी माणसेच अथवा हितशत्रूच त्रास देतील असे नव्हे तर ? मांत्रिक व अगदी भुतेखेते सुध्दा असह्य त्रास , पीडा व तडफड देऊ शकतात.
पण या सा-यावर मात करण्यासाठी व दु:ख मुक्त होण्यासाठी हिंदू धर्म शास्त्रामध्ये अनेक यथोचित मार्ग दाखवले आहेत.
अगदी सन्मार्गाने गडगंज संपत्ती व राज ऐश्वर्य प्राप्तीचे ही अनेक अद्भूत रस्ते आपल्या धर्मात दाखवलेले आहेत.
अतूट विश्वास , चिकाटी व अथक प्रयत्नवाद तुम्हाला नक्कीच दिव्यत्वापर्यंत तर घेऊन जाईलच पण ? जीवनात जे हवे ते सुध्दा मिळू शकेल.

आपले जीवापाड प्रेम असणारी पण कायमचीच दूर गेलेली माणसे सुद्धा आपल्याला पुन्हा भेटू शकतील.

अनेक चमत्कार करण्याची दिव्य शक्ती सनातन हिंदू धर्मामध्ये आहे , हे अनेक महा सिध्द योग्यांनी या देशात वारंवार सिद्ध करून दाखवलेले आहे , आणी हे आजही स प्रमाण कागदोपत्री आहे.

आता अदृश्य जगतातील असह्य त्रासाचे माझ्या जीवनातील कांहीं अनुभव मुद्दाम नमूद करतो…

एक अनुभव असा आहे की , एका तांत्रीकाने मला व माझ्या परीवाराला संपूर्णपणे उध्वस्त व बरबाद करण्यासाठी माझ्यावर उच्चाटन प्रयोग यशस्वी करण्यासाठी एक *चेडा* पाठवला.

त्यावर उपाय योजना म्हणून मी एका तांत्रीकाकडून त्या चेड्याला मी त्याचे खाद्य दारू व अंडी देऊन मुक्त केला.तेंव्हा माझा ही थोड्या दिवसातच सगळा त्रास संपला.

मानसातली काय अथवा अतृप्त योनितली काय ?
भुतावळी ही अती भयंकर असतात.आणी त्यांना तोंड देणे आणी त्यांच्यावर विजय मिळवणे म्हणजे ? महाभयानक अवघड कार्य.

आता प्रश्न असा निर्माण होतो की , सात्विक साधने मध्ये मांस मदिरा कसे चालते ?
तर त्याचे उत्तर असे की , भुतावळी व अतृप्त आत्मे त्याशिवाय शांत होतच नाहीत.त्यांचे खाद्य त्यांना द्यावेच लागते.

कली युगामध्ये ब-याच वेळा सात्विक शक्ती पेक्षा तामसी व अघोरी शक्ती ताकतवर ठरते.

ब-याच वेळा तामसी शक्तींना आटोक्यात आणून सामाजिक सौहार्द साधण्यासाठी कायद्यामध्ये सुध्दा मृत्यू दंडाची शिक्षा दिली जाते.

ईश्वरी अवतार कार्यामध्ये सुध्दा असेच कार्य केले जाते.
म्हणूनच देवी देवता सुध्दा नेहमी शस्त्र सज्ज असतातच असतात.

या निमित्ताने पशू बळीचे अथवा हत्येचे मी समर्थन करत नाही.
कारण…
” *अहिंसा परमो धर्म: “*
हाच ईश्वरी सिध्दांताचा पाया आहे.
पण त्या पुढे ही जाऊन ,
” *धर्म हिंसा तदैव च्…”*
हा पण धर्म सिध्दांतच आहे.

कारण आसुरी शक्तीवर अंकुश ठेवल्याशिवाय सृष्टी संतुलन रहात नाही.

मी हत्येचे समर्थन करत नाही , हे इथे मुद्दाम नमूद करतो.पण वध अथवा मृत्यू दंड हा शब्द सर्व परिचित आहे.

माझा दुसरा एक अनुभव असा आहे की ,
एका भयंकर उग्र तांत्रिकाने माझ्यावर एक *जींद* सोडले होते.
मला त्या अती त्रासदायक व भयावह जींदालाही खूप प्रयत्नाने मुक्त करावे लागले.

माझा तिसरा एक भयंकर अनुभव असा आहे की , आमच्या शेतात एक पिंपळाचे झाड होते. व त्यावर एका मुंज्याचे वास्तव्य होते.
कांहीं कारणास्तव ते पिंपळाचे झाड माझ्या लहानपणी कोणी तरी त्याचा विधी न करताच तोडले.
त्यामुळे त्या मुंज्याने बरीच वर्षे माझे संपूर्ण घरदार संपूर्ण पणे उध्वस्त करण्यासाठी अती भयावह व असह्य गोंधळ घातला होता.
पण परम ईश्वरी कृपेने तो मुंजा ही आज शांत झाला आहे. व मला आशिर्वाद स्वरूप दिव्य दर्शन देत आहे.
पण तरी सुद्धा माझ्या शेतात मी अनेक वेळा पिंपळाचे झाड लावण्याचा प्रयत्न करून सुध्दा ते झाड तग धरत नाही कींवा टिकत नाही.

अजून एक माझा असाच एक भयंकर अनुभव आहे.
आमच्या शेतामध्ये आमच्या एका सिध्द पुरूषाची व पुर्वजांची एक पुरातन समाधी आहे.
त्यांना पिंडदान करणारे कोणी नसल्यामुळे त्यांचा ही आमच्या घरा दाराला भयंकर त्रास झाला.

दैवी कोप हा फार भयंकर असतो.

श्री क्षेत्र नीरा नरसिंह पूर येथे जाऊन मला त्यासाठी विधिवत पणे पिंडदान देऊन तो त्रास काढावा लागला.
त्यामुळे सुध्दा माझा बराच त्रास हळूहळू कमी झाला.

आता नास्तिक लोक याला थोतांड म्हणतील.हसतील , टिंगली करतील.
*त्याला इलाज नाही.*
हे हैवानी शक्तिने व्याप्त अती भयावह कली युग आहे.
इथे असे घडणारच.
त्याला तोंड देतच पुढे जावे लागणार.

” *धर्म बुडवे चेतले* *जागोजागी* ”
असो…

दिव्य ध्येयाकडे जाण्यापूर्वी अजूनही अनेक अदृश्य संकटे माझा पिच्छा करत आहेतच.त्याचाही सामना करत , मार्ग काढत पुढे जावेच लागणार आहे.

ब-याच वेळा मला गुप्त ठिकाणी जाऊन , दोन दोन महिने, अनेक प्रकारच्या ईश्वरी साधना आजही कराव्या लागत आहेत.आणी ते गरजेचे ही आहे.

आदी दैविक आदी भौतिक त्रिवीध तापातून सुटून अशक्य ते शक्य करण्याची अद्भूत शक्ती आपल्या सनातन धर्मामध्ये नक्कीच आहे.
फक्त चिकाटी आणि श्रध्दा तुम्हाला नक्कीच परमोच्च स्थानापर्यंत हमखास घेऊन जाते.
हा माझा स्वानुभव आहे.

या भयावह कली युगामध्ये , भविष्यामध्ये पृथ्वी तलावर अजूनही अती भयावह घटना घडणारच आहेत.त्यातून प्रचंड जागतिक उलथापालथ होऊन प्रचंड मनुष्य हानी तर होईलच पण ,
उन्मादी आणि आसुरीक शक्तिवर अदृश्य ईश्वरी शक्तिकडून अदृश्य रूपात भयंकर प्रहार देखिल केला जाणार आहे.
आणि ?
बिघडलेले सृष्टी संतुलन पुन्हा व्यवस्थित केले जाणार आहे.

वैश्विक ईश्वरी शक्तिच्या अंतिम विजयासाठी कार्यासाठी अव्याहतपणे धडपडणाऱ्या पवित्र आत्म्यांना एकत्र आणून कार्याला गती देण्यासाठी व दु:खातिरेकाने त्रस्त असणारांना सुयोग्य मार्गदर्शन होऊन त्यांचे असह्य जीवन सुसह्य व्हावे या उद्देशाने या लेखाचे प्रायोजन केले आहे.

लेख आवडल्यास नक्कीच शेअर करा.

बंधन मुक्त जीवनातून अलौकिक शक्ती कडे जाण्याची ईश्वर सर्वांना बल व शक्ती देवो.

शिव शक्तीचे मिलन व त्यातून होणारे सृष्टी कल्याण सर्वांनाच अपेक्षित असते.

संपर्क साधल्यास नक्कीच सुयोग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन.

*जय हरी विठ्ठल*
*श्रीकृष्णार्पणमस्तू*

🙏🙏🙏🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!