7 Views

*औदुंबराच्या वठलेल्या* *झाडाला* *पालवी फूटली…?*
जगातला कोणताही डाॅक्टर मला दुरूस्त करू शकला नसता , एवढी भयावह आग व कीड माझ्या आयुष्याला लागली होती.
पण , सद्गुरू आण्णा नावाचा डाॅक्टर ज्यांनी, माझे आयुष्यच पार बदलवून टाकले.
जसे भिरूड नावाचा किडा संपूर्ण झाडच आतून पोखरून काढतो व ते आतून संपूर्ण पोखरलेले झाड , संपूर्णतः जळून , वाळून जाते , तशी माझ्या संपूर्ण शरीराची व आयुष्याची अवस्था झाली होती.
अनेक वर्षे….
पार उध्वस्त झालेले , संपूर्ण शुद्ध हरवलेले भयावह आयुष्य…??
पुन्हा सावरले…
एक ईश्वरी चमत्कार…?
राजा विक्रमादित्यासारखा …?
पण ? त्या झाडालाही ?
सद्गुरू नावाच्या अजीब रसायनाने, पालवी फोडली आणी फलाफूळांनी झाड बहरून गेले.
झाडं औदुंबराचे होते पण संपूर्णतः वठलेले , शाखाविहीन , पर्णविहीन झालेले होते.
आणी विशेष म्हणजे , या संपूर्ण पणे वाळलेल्या, जळालेल्या दुर्लक्षित औदुंबराच्या झाडालाही दुष्ट लोक , सतत तेल ओतून पेटवून देण्याचाच सतत प्रयत्न करत होते .
घोर कलियुग.
अनेक वर्षे माझी आतून सगळीच हाडे तुटलेली होती.फॅक्चर , ढिसूळ हाडे , एस्थोपोरायसीस पेक्षाही भयंकर असह्य अनेक वर्षांची तडफड, असह्य वेदना , शरीरात आगडोंब पेटल्यासारखा असह्य वणवा.
आणी माझी पत्नी ? अशावेळी सुध्दा ,
त्या वठलेल्या औदुंबराच्या झाडाला ही दररोज पाणी घालायची आणी प्रदक्षिणा घालायची…!
अनेक वर्षे , अथकपणे…
*सद्गुरू आण्णा की जय*
*अवधूत चिंतन श्री* *गुरूदेव दत्त*
*विनोदकुमार महाजन*
