29 Views

त्यांचेही आभार https://globalhinduism.online/?p=4352
विनोद महाजनला
चक्रव्यूहात अडकवून संपवण्याचे डाव टाकणारांचे मनापासून आभार .
बदनाम्या करून जगणंच मुश्किल करणारांचे , अनेक अफवा पसरवून अख्ख आयुष्यच बरबाद करण्याचे स्वप्न बघणारांचे , मला आयुष्यातूनच उठवण्याचे स्वप्न बघणारांचे मनापासुन अनेक आभार .
जिवापाड प्रेम करूनही जगणंच मुश्किल करणारांचे , जीवन हराम करणारांचे सुध्दा मनापासुन आभार .

यामुळेच मी प्रत्येक क्षण जीद्दीने लढत गेलो .
त्यामुळेच ईश्वराच्या अगदी जवळ गेलो .

आणि आज ईश्वर स्वरूप झालो .
जगन्मिथ्या , ब्रम्हंसत्य
हे कोडे उलगडले .

म्हणूनच माझा भयावह मानसिक छळ करणाराचे , माझं जगणंच मुश्कील करणाराचे मनापासून आभार .

जे होतं ते भगवंताच्या इच्छेनुसार होतं .
आणि जे कांहीं होतं तेही चांगल्यासाठीच होतं .

ईश्वर किती महान आहे ,
आणि ईश्वराने बनवलेला छोटासा मनुष्य प्राणी किती लहान आहे , स्वार्थी , मतलबी , अहंकारी आहे हेही अंतिम सत्य कळालं .

प्रभुइच्छा बलीर्यसी .

हरी बोल .
विनोदकुमार महाजन .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!