243 Views

*तुमच्या साठी वेगळं* *”पॅकेज ” असेल ??*
✍️ २८०४

*विनोदकुमार महाजन*

💰💰💰💰

*पॅकेज…*
तरतुदींच पॅकेज
आर्थिक लाभाच पॅकेज
भविष्यकालीन आनंदाचं पॅकेज
तुमच्या कुवतीनुसार , शिक्षणानुसार ,
तुमच्या निर्णयानुसार ,
मिळालेल आर्थिक वरदानाच पॅकेज…

*होय पॅकेज…*
आर्थिक लाभ हानीच पॅकेज…
घबाड…धनाच घबाड
आर्थिक लाभाच घबाड
प्रत्येकाच्या नशीबानुसार , कर्म गती नुसार
मिळालेल सुखदुःखाच पॅकेज…

तसं पाहिलं तर आजचं जीवन सगळं पॅकेज वरच चालतं
आर्थिक लाभाच पॅकेज
आर्थिक विकास…

तुमच काय माझं काय
अगदी सगळ्यांच्या आयुष्याच्या सुखदुःखाचं गणित या पॅकेज वरच चालतं.

जेवढ पॅकेज मोठं तेवढं सुख सुध्दा मोठं अशी साधारण सामाजिक कल्पना असते.
दहा लाखाच पॅकेज , पन्नास लाखाच पॅकेज , दोन कोटीच पॅकेज…
असं वेगवेगळं आर्थिक पॅकेज…

पण ज्याला पॅकेज आहे त्याच ठीक आहे हो…
भलमोठ्ठ आर्थिक लाभाच पॅकेज…
तशी दुनिया आणी दुनियादारी सरासरी या पॅकेज वरच चालते.

पण ज्याला पॅकेज नाही तो ?
शून्य ??
म्हणजे ?
एखाद्याचं हातावरच पोट आहे , एखाद्याला मोल मजुरी करून जगावं लागतं तर एखाद्याला रात्रंदिवस मरमर काबाडकष्ट करूनही सुख मिळत नाही..

सतत धावपळ , ओढाताण , उसने पासने पैसे करून कसंतरी जगावं लागतं…
जीव अगदी मेटाकुटीला येतो.
अन् सततच्या त्या तडजोडीन जगणंच जणू असह्य होतं.

पण याचंच तर नाव जीवन आहे मित्रा.
सुखदुःख येतं आणी जातं.
हे चालतंच रहात.
आणी हे चालतंच राहणार.

कुणाचं सुख मोठ्ठं तर कुणाचं सुख छोट्ट…
चालतंच राहणार.
आखिर नशीब अपना अपना …

दुसरा मोठ्ठा सुखी आहे , मोठ्ठे पैसे कमावतो , मोठ्ठ्या बंगल्यात राहतो म्हणून ? आपण का दु:खी व्हायचं ?
आपण का झुरतं रहायचं ?
होय ना ?

पण तरीही सगळ्यांची एक वेडी आशा असते.
अगदी प्रत्येकाची.
एक दिवस आपलेही नशीब बदलेल.
आपणही खूप सुखी होऊ.
आपणही पैशाने मिळणारी सगळी सुख मिळवू…
असं अगदी प्रत्येकाचंच वेड स्वप्न असतं.
होय ना ?

पण काय करणार ?
नशीबापुढे कुणाचं कांहीं चालतच नाही असं म्हणतात.

अहो पण एखाद्याचं नशीबच एवढं भयानक असतं की त्याला शेवटी देवाकडे प्रार्थना करावी लागते…
” *आता तरी देवा मला* *पावशील काय ?* *सूख ज्याला* *म्हणत्यात ते* *दावशील काय ?”*

पण अशाने कांहीं सुख भेटत नाही.मुळीच भेटत नाही.
आणी आपलं नशीब, कर्मही बदलतं नाही.
दररोजचंच ते रटाळ पाट्या टाकण्याच असह्य जीवन.
आणी दररोजचीच ती असह्य , जीवघेणी तडफड.

पण ? पण ??
*तुमचं पॅकेज*
कदाचित इतरांपेक्षा वेगळे असेल.
इतरांच्या पेक्षा खूप खूप मोठं आणी सुंदर असेल.
आज ईश्वर तुम्हाला जरी खूप मोठ्ठं दुःख देत असला तरी त्या दु:खाचाही कदाचित फार मोठ्ठा उद्देश्य असेल.
अस्सल सोनं अग्नीत जळूनच तावून सुलाखून बाहेर निघत ना ?
तसं आपलंही कदाचित नशीब असेल.

मग हताश , उदास होऊन का बरं जगायचं ?
दररोजचा दिवस मस्त आनंदी होऊन जगायचं.मस्त कलंदर होऊन जगायचं.
दु:खातही सुख मानायचं.

“ये *भी दिन जायेंगे*
*तेरे भी दिन आयेंगे प्यारे”*
असं मस्त मनात दररोज म्हणायचं आणी दररोज मस्त खुशीत जगायचं.
*इसीका नाम जींदगी है.*

आणी कदाचित…
त्या ईश्वरी रचनेनुसार उद्याचा दिवस तुमचा असेल…
आनंदाचा , भाग्याचा , यशाचा , श्रीमंतीचा , *दैदिप्यमान आयुष्याचा…*

म्हणूनच मस्त होऊन जगायचं.
स्वतः सुखी व्हायचं.
आपल्या वर
खरं खरं प्रेम करणारालाही आयुष्यभरासाठी सुखी करायचं…
डन्न…👆👍👍👍

हेच तर खरं सुखी आणी आनंदी जीवनाचं रहस्य आहे मित्रा.

चला तर मग.
आपण सुखी होऊ या.
दुसऱ्यांनाही सुखी करू या.

निदान आजच्या घडीला तसे स्वप्न तरी बघू या.

कदाचित त्या ईश्वरी रचनेनुसार तुमचे पॅकेज सगळ्यांपेक्षा खूप खूप मोठ्ठ असेल…
ईश्वर त्यासाठी व तुमच्या सुखासाठी कदाचित मोठमोठ्या योजना ही आखत असेल.
कदाचित तुमचं नशीब इतरांपेक्षा खूप खूप मोठं असेल.
म्हणूनच प्रत्येक दिवस मस्त आनंदाने जगायचा प्रयत्न करू या.

मी *सुखी होणार*
असं दररोजच पालुपद गिरवलं की तो माणूस नक्कीच सुखी होतो हो.
अगदी माझंच उदाहरण आहे हे.

मला तर नेहमी असंच वाटत की , जगात माझ्यासारखा भाग्यवान कोणीच नाही.माझ्यासारखा सुखी कोणीच नाही.

तुम्ही पण दररोज असंच म्हणत रहा.
बघा एक दिवस तुमचंही नशीब नक्कीच फळफळेलं.आणी जगात तुमच्या सारखा दुसरा कोणीच सुखी नाही असंही तुम्हाला एक दिवस नक्कीच वाटायला लागेल.

वाटल्यास माझ्यासारख्या सुखी माणसाशी दोस्ती तरी करायचा प्रयत्न करा.
मस्त गप्पा मारत मारत सुखी समाधानी आनंदी होऊन छान छान *ईश्वरी* आयुष्य जगू या .
असं म्हणतात की ,
*सुख वाटल्याने ते सुख* *भरभरून वाढतं.*

म्हणूनच सुखी आनंदी माणसं सुद्धा सगळ्यांना भरभरून आवडतात.कारण त्यांच्या संगतीत सगळेच सुखी होतात.

👍💰

*आनंदाचे डोही आनंद* *तरंग*

*सर्वे भवन्तु सुखिन:*

*जय हरी विठ्ठल*

🌞🌞👍💰💰

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!