26 Views

*सुखी जीवनाचे रहस्य*
✍️ २८३४

*विनोदकुमार महाजन*

🩷🩷🩷🩷

खरंच सांगा बरं मित्रांनो ,
आजकाल खरंच सुखी जीवन राह्यलयं का हो कुणाचं ?
दररोजची दगदग , धावपळ , दररोजच्या शंभर कटकटी आणी त्यातून निर्माण होणारी डोकेदुखी…
आर्थिक समस्या , आजारपण , पोरा बाळांच्या भविष्याची चिंता… त्यामुळे येणारे टेन्शन , बर्डन…

बरं कुठे टेन्शन, दुःख हलके करावे म्हटलं तर तशी विश्वासाची जागाही कुठे शिल्लक राहिली नाही.

मनमोकळे बोलण्याने , हसण्या खेळण्याने बरीच दु:खे हलकी होतात असे म्हणतात.
पण मन… मोकळं करण्यासाठी पण तशी विश्वासाची जागा असावी लागते ना ?

बर पुन्हा झालंय कसं तर ? अगदी विश्वासाने कुणापाशी कांहीं बोलावे , मन हलके , मोकळे करावे तर ?
गैरफायदा घेणारेच समाजात भरपूर भेटतात.

खेड्यातली एक म्हण आहे…” रडून ऐकायचं आणी ? हसून सांगायचं…”
तर मग सांगा… असलं मॅटर असेल तर कोण कुणावर विश्वास ठेवेल हो ?

आणी आज समाजातून विश्वास ही गोष्टच जवळपास हद्दपार झाली आहे की काय असे वाटू लागले आहे.

जागोजागी विश्वास घाताचेच प्रमाण वाढले आहे की काय ?
माणसं ही
सुध्दा सरळ सरळ म्हणतात हो…” विश्वास पानीपतच्या युध्दातच मेला…”

मग आता सांगा की ,
विश्वास कुणावर ठेवायचा , किती ठेवायचा आणी मन हलकं कुणापाशी करायचं ?

जिकडे तिकडे संशयाचं भूत सगळ्यांच्या मानगुटीवरच बसलेलं दिसतं नाही तर हे भयंकर भूत , अनेकांच्या बोकांडावर बसुन सगळ्यांनाच ठेचून काढत आहे.

आणी त्यामुळे अनेक सामाजिक समस्या आणी त्यातुनच अनेक सामाजिक विकृती निर्माण होत आहेत.

दया , माया , प्रेम , वात्सल्य , विश्वास समाजातून जणू गायबच होतो आहे की काय ? असे वाटू लागले आहे.
ते ही सुसंस्कृत म्हणवणाऱ्या आणी देवीदेवतांच्या देशात ?

असं भयंकर आक्रीत , विपरीत का घटतंय तेच कळेनासे झाले आहे.

जागोजागी नात्यागोत्यातही ताण तणाव आणी टेन्शनस् वाढू लागली आहेत.

म्हणूनच की काय कुणी कुणाकडे जात येत नसावे का ?
कुणी कुणाची आत्मियतेने विचारपूस ही करत नाही.
अशी दयनीय सामाजिक अवस्था होते आहे.

मग मला सांगा की ,
सुखी जीवनाचे रहस्य शोधायचे कुठे आणी कसे ?

त्यावरही एक मार्ग आहे.
सगळी टेंन्शनस् कृष्णार्पणमस्तु म्हणायची…आणी मस्त , बिनधास्त आयुष्य जगायचं.
चार मित्र जोडायचे.
त्यांच्याशी मस्त गप्पा मारायच्या.
अगदी लहान मुलासारखं बिनधास्त हसायचं , खेळायचं.अगदी बालिश होऊन जगायचं.
मस्त निरागस आयुष्य जगायचं.

टिव्ही मोबाईल वर मस्त पैकी जुनी गाणी लावून , ती गाणी ऐकायची आणी गुनगनायची सुध्दा.
बाथरूम मध्ये पण मस्त फिल्मी गाणी गुनगुनायची.
नेहमी ह्रदय मस्त आनंदी ठेवायचं.
सुख असो अथवा दुःख , त्यातही आनंद शोधून छान जगायचं.

निरागस पशुपक्षांसी मैत्री करायची.प्रेमाची भाषा ते ही समजतात हो.मस्तपैकी आपल्याशी एकरूप होऊन जातात.

शक्य असेल तर देशी गाई पाळायच्या.फार प्रेमळ , वात्सल्यपूर्ण आणी परोपकारी गौमाता.तिचे संपूर्ण जीवनच परोपकारी असते.
त्या गौमातेला आई आई म्हणून हाका मारत प्रेमाने बिलगायचं.तिच्याशी मस्त आनंदाने गप्पा मारायच्या.तिची शेण झाडलोट काढायची.तिच्या धारा काढायच्या.
मग बघा जीवनात आनंद कसा ओसंडून वाहतोय ते ?
अगदी श्रीकृष्णासारखा.

शक्य असेल तेंव्हा देशाटन करायचे.प्रवासाचा मस्त आणी मनसोक्त आनंद लुटायचा.

दीन दुःखीतांना नेहमी आधार द्यायचा.
रंजल्या गांजलेल्यांना आनंद द्यायचा.

आणी सगळं करून , मिळालेला आनंद ही पुन्हा मोठ्या आनंदाने आणी निरपेक्ष वृत्तीने ईश्वराच्या चरणावर अर्पण करायचा.

मग बघा कसं मस्त , छान , आनंदी , खुसखुशीत आयुष्य चालू होतंय ते ?

अहो हेच तर खरे सुखी जीवनाचे रहस्य आहे.

आनंद घ्या , आनंद द्या.
मस्त कलंदर होऊन आनंदी आयुष्य जगू या.

शोधा म्हणजे सापडेल.

*जय जय राम कृष्ण हरी*
*विठ्ठोब्बा रखुमाई…*
*जय जय विठ्ठोब्बा* *रखुमाई…*

🙏🚩🚩🩷

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!