100 Views

*प्रेमाची नशा…??*
✍️ २८६१
*विनोदकुमार महाजन*
🩷🩷🩷✅
*होय…*
अगदी बरोबर लिहिलंय मी हे…
प्रेमाची नशा …
प्रेमालाही एक नशा असते.
जबरदस्त नशा.
आपल्यावर कुणीतरी प्रेम करतंय , अगदी खरंखुरं , निष्पाप , निरपेक्ष प्रेम करतंय ,
असं वाटणं आणी असं सत्यात असणं म्हणजे खरोखरीच एक ?
उच्च कोटीचा आनंद असतो.
आनंदी जीवन जगण्यासाठीचा तो एक उत्तम अनुभव असतो.
*आत्मानुभूती…*
प्रेम…
पवित्र प्रेम ,
ईश्वरी प्रेम…
याचं वर्णन खरोखरीच शब्दात करणं अशक्य आहे.
कारण ?
प्रेम हे प्रेम असतं.
प्रेम म्हणजे एक खंबीर आधार असतो.
खंबीर मानसिक आधार.
प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारा मानसिक आधार.
मग ते प्रेम ?
आईच आणी लेकराचं असो , दोन मित्रांचं असो , गुरू आणी शिष्यांच असो अथवा भक्त भगवंताचं असो.
अथवा दोन निष्पाप प्रेमीकांच प्रेम असो.
प्रेम हे प्रेमचं असतं.
त्याला व्याख्या नसते.
ती एक अनुभूती असते.
उच्च कोटीची अनुभूती.
अख्या जीवनभर आधार देणारी उत्तुंग अनुभूती.
प्रेमाला पंखही असतात.
कारण ? या पंखांन तर उज्वल भविष्याच्या अनेक उत्तुंग गरूड भरा-या घेता येतात.
सुखी आनंदी जीवनाची स्वप्न रंगवता येतात.
आपल्या पाठीशी कुणी तरी खंबीरपणे उभा आहे , ही प्रेमाची दिव्य अनुभूती , मोठमोठ्या संकटांवरही मात करण्यासाठी भक्कम असते.
प्रेमात
घात नसतो ,
विश्वास घात नसतो ,
फसवणूक ही नसते.
प्रेमात एक समर्पण असतं.
संपूर्ण समर्पण.
देह मन बुद्धी आत्म्याचं समर्पण.
तन मन धनाचं समर्पण.
त्यात स्वार्थ नसतो.
पैशाचा बाजार नसतो.
अहंकाराचा वारा नसतो.
प्रेमात संपूर्ण विश्वास असतो.
दृढ विश्वास.
एकमेकांना समजावून घेण्याची , एकमेकांना खंबीरपणे आधार देण्याची , उच्च कोटीची मानसिकता असते प्रेमामध्ये.
म्हणूनच प्रेमाला ईश्वराची उपमा देतात.
प्रेम हे ईश्वराच्या ह्रदयातून निर्माण झालेले एक अमृत आहे.
म्हणूनच प्रेम हा एक अमूल्य ठेवा आहे.
तो आयुष्यभर जपून ठेवता आला पाहिजे.
देह दोन , आत्मा एक ,
असं प्रेम असतं.
अगदी राधा कृष्णासारखं.
ख-या प्रेमात दुःखाचे , संकटाचे मोठमोठे डोंगर ही लीलया पार करता येतात.
म्हणूनच तर प्रेमाला एक नशा असते.
खूप मोठी नशा.
एकदा का ही नशा चढली की ती ?
आयुष्यभर राहते.
आयुष्यभर आनंदी ठेवते.
आणी ?
प्रेमाच्या नशेपुढं ?
बाकी सगळ्या नशा किरकोळ असतात.
य:कश्चित…
भगवंतावरच्या प्रेमाची नशाही अशीच असते.
ती तहान – भूक सगळं सगळं विसरायला लावते.
ईश्वरी शक्तीशी एकरूप व्हायला शिकवते.
ही नशा ?
जन्मोजन्मी टिकते.
ही नशा धर्म अर्थ काम मोक्ष शिकवते.
ही नशा अनेक सिध्दी बहाल करते.
ही नशा सदैव उच्च कोटीचा स्वर्गीय आनंद देत राहते.
म्हणूनच तर सांगतो मित्रांनो… करून तर बघा असं खरंखुरं लाघवी प्रेम.
मग तुम्हाला ही नशा कायमचीच चढेल.
आणी ?
या दिव्य प्रेमासाठी तुम्ही अगदी वेडेपिसे व्हाल…
अगदी आयुष्यभरासाठी …
माझे आजोबा…
ज्यांनी मला खरं प्रेम शिकवलं…
त्यांना देहत्याग करून बत्तीस वर्षे झाली , पण अजूनही नित्य त्यांची आठवण येते.त्यांच्या आठवणीने आजही डोळे भरून येतात.
तेच माझे गुरू झाले.
स्वप्नात मला त्यांनी अनेक वेळा दर्शन , दृष्टांत देऊन माझ्या नरदेहाचे सार्थक केले.
त्यांनीच मला स्वप्नात येऊन गुरूमंत्र ही दिला.
माझ्याकडून अनेक वर्षे खडतर तपश्चर्या करून घेतली.
त्यांच्या कृपेमुळे अनेक देवीदेवतांची दिव्य दर्शने पण झाली.
प्रेमात अशी जबरदस्त ताकद असते , शक्ती असते.
नराचा नारायण बनवण्याची एक अद्वितीय दैवी शक्ती असते.
म्हणूनच निरंतर प्रेम करत रहावे.
पण प्रेम हे ?
एकतर्फी नसावे.
दोन्ही बाजूंनी जेंव्हा प्रेम केले जाते , तेंव्हाच ते दिव्यत्व प्राप्त करून देते.
*जय राधेकृष्ण*
🌹🌹🩷✅
