23 Views

*अशक्य गोष्टी शक्य* *करता येतील का ?*
✍️ २८८४

*विनोदकुमार महाजन*

👆👍🤔🕉️

अशक्य गोष्टी शक्य करता येतील का ?
हो…!
नशीब बदलता येईल का ?
हो…!
हाताबाहेर गेलेल्या केसेस आटोक्यात येतील का ?
हो…!

आध्यात्मिक साधनेमध्ये अनेक अशक्य वाटणा-या गोष्टी शक्य करण्याची जबरदस्त क्षमता व शक्ती नक्कीच आहे.
माझा स्वतःचा अनुभव आहे.

योग्य गुरूच्या मार्गदर्शनाखाली , कठोर तपश्चर्या करून आपले नशीब नक्कीच बदलता येते.
होय…!

एवढेच नाही तर संपूर्ण *शालिनतेने* एखादा ईश्वरी कृपा प्राप्त व्यक्तीच्या अथवा व्यक्तिशः माझ्या संगतीत आला तरी …?

त्याला ही संपूर्ण सुखी , समाधानी , आनंदी करण्याची शक्ती व क्षमता शक्तीमुळे साध्य होते .

अनेक सिध्द पुरूषांनी हे वारंवार सिद्ध ही केले आहे.

मी एक साधारण व्यक्ती जरी असलो तरी सद्गुरू कृपेचे अलौकिक वलय मला नक्कीच प्राप्त झाले आहे.

सकारात्मक उर्जेमध्ये अनेक अशक्य गोष्टी शक्य करण्याची अद्भूत क्षमता असते.
फक्त ते आपल्याला भेटणारे *पात्र ?* *सत्पात्री* असावे लागते.

निगेटिव्ह एनर्जी ने ग्रासलेले , संशयखोर , आढ्यताखोर , हेकेखोर , अहंकाराने ग्रासलेल्या व्यक्ती व समुदायाला प्रत्यक्ष ब्रम्हदेव ही बदलवू शकत नाही.

म्हणूनच हे जग… ही सृष्टी…पाॅझीटिव्ह निगेटिव्ह शक्तिवर विसंबून आहे.
आणी दोन्ही मध्ये संघर्ष हा अव्याहत पणे चालू आहे.

सृष्टी चक्र पण यावरच चालते.
दक्षिण ध्रुव व उत्तर ध्रुव ,
चांगला आणी वाईट ,
ही दोन्ही विरूद्ध टोके… एकत्र कधीच येऊ शकत नाहीत.

जसे दक्षिण ध्रुव आणी उत्तर ध्रुव एकत्र येऊ शकत नाहीत तसेच , चांगले आणी वाईट माणसे एकत्र कधिही नांदू शकत नाहीत , हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

मग तुम्ही म्हणाल की मग ? आध्यात्मिक शक्ती मध्ये कसली आलीय अद्भूत शक्ती ?
जी ?
अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करेल ?

बरोबर ?
अगदी बरोबर !
पण…?

*दुर्जनं प्रथमं वंदे*
इथपासून याची व्याप्ती चालू होते.
कारण दुष्ट लोकांचे ह्रदय परिवर्तन स्वतः ईश्वरही करू शकत नाही.

सत् असत् या दोन विरुद्ध शक्तींचे संघर्ष सृष्टीच्या निर्मितीपासून ते अंतापर्यंत असेच चालूच राहणार आहेत .
कारण ईश्वरी रचनेचाच तो एक अविभाज्य घटक आहे.

यासाठी
राम रावण , कृष्ण दुर्योधन अशी अनेक उदाहरणे आहेत.

याच सिद्धांतानुसार प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्ण याने पण आपल्या सख्ख्या मामाचा, कंसाचा सुध्दा वध केला होता.

आणी ? सृष्टी संतुलनासाठी ते अत्यावश्यक पण होते.

आसुरीक शक्तीचे जेंव्हा जेंव्हा प्राबल्य वाढते आणी सज्जन शक्ती जेंव्हा धोक्यात येते ?
तेंव्हा ईश्वराला स्वतः होऊन सृष्टी चक्राचा एक हिस्सा होऊन अवतरीत व्हावे लागते व सृष्टी चक्र पुन्हा व्यवस्थित करावे लागतेच लागते.

आजची जागतिक स्थिती काय दर्शवते ?

साम दाम दंड भेद या निती प्रमाणे दुष्ट लोकांना सुधारण्याची संधी नक्कीच देता येते पण ?
त्याने ही दुष्टात्मा ? पापात्मा नाही सुधारला तर ?
मृत्यू दंडाचे ही प्रायोजन ईश्वरी शक्ती मध्ये असते.
म्हणूनच तर कायद्याने सुध्दा एखाद्याला मृत्यू दंड दिला जातो.

श्रीकृष्ण सुध्दा सांगतो…
” अहिंसा परमो धर्म‌‌‌:
धर्म हिंसा तदैव च्…”

आणी आजची भयावह विनाशकारी जागतिक स्थिती व त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आज हीच ?
*काळाची गरज आहे ?*
*का…?*
यावरही मंथन व्हावे.

असो…
हा विषय संपूर्णतः वेगळा आहे.
आता वळू या मूळ विषयाकडे…

आध्यात्मिक साधनेमध्ये अशक्य गोष्टी शक्य करण्याची अद्भूत क्षमता आहे का ?
होय नक्कीच आहे.

मी स्वतः अनेक वर्षांच्या अथक आध्यात्मिक साधनेतून अशक्य अशा वाटणा-या अनेक गोष्टींवर प्रभुत्व मिळवले आहे.

माझे स्वतःचे जीवन म्हणजे अनेक चमत्कार होत.

अनेक चमत्कारिक घटनांनी माझे संपूर्ण जीवनच व्यापलेले आहे.

मी माझ्या चांगलपणाची जाहिरात करत नाही अथवा तसा माझा उद्देश ही नाही.
उद्देश एवढाच आहे की ,
आज संपूर्ण जगावर जे अधर्माचे भयंकर विनाशकारी संकट उभे आहे ? त्यावर त्वरीत व प्रभावी उपाययोजना होऊन , सत्याच्या अंतिम विजयाचा मार्ग विस्तृत व्हावा.

त्यासाठी जागतिक पातळीवर संपूर्ण सज्जन शक्ती एक होणे अत्यंत गरजेचे आहे.
व या शक्तीशाली शक्तीमधून वैश्विक स्तरावर एक प्रभावी उर्जा स्त्रोत बनवून , ईश्वरी शक्तींशी सर्वांना जोडणे , हा या मागचा उद्देश आहे.

कारण समस्त मानवतेची अंतिम शाखा एकच आहे…
*सत्य सनातन धर्म .*

संपूर्ण सजीव सृष्टीचा पसारा व संपूर्ण ब्रम्हांडाचाही पसारा…
ईश्वराधिष्ठित व मानवी मुल्यांची संपूर्ण जोपासना करून , संपूर्ण सजीवांना अभय देणारा…
व त्याचा मूळ सिध्दांत सांगणारा व स्विकारणारा पाया…
याच *सत्य सनातन* धर्मावर आधारित आहे.

समाजात ढोंग , पाखंड उच्च प्रमाणात वाढले असले तरी ?
मत मतांतरे व मतभेद यांना संपूर्ण फाटा देऊन , वादग्रस्त विषय बाजूला ठेवून , प्रश्न काय आहेत आणी त्यावर अंतिम उत्तर काय आहे ?
या अंतिम उद्दिष्ट पुर्तीकडे संपूर्ण लक्ष केंद्रित करणे …
हाच आजच्या लेखाचा मूळ विषय आहे.

*श्रीकृष्णार्पणमस्तू*

🙏🕉️🚩🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!