non gamstop casino uk chicken road aviator non gamstop casino chicken road वरचा खालच्याला दाबतो – GlobalHinduIsm
5 Views

*वरचा खालच्याला* *दाबतो…*
✍️ २८९४

*विनोदकुमार महाजन*

👍👍👍👍

होय…जणू निसर्ग नियमच आहे हा…
वरचा नेहमीच खालच्याला दाबत राहतो ?

मराठी म्हणीमध्ये अनेक म्हणी आहेत…
जसे…
” वासरात लंगडी गाय शहाणी…
सत्तेपुढे शहाणपण चालत नाही…
बळी तो कान पिळी…
ज्याच्या हाती ससा तो पारधी…”
वगैरे वगैरे…

” बाॅस आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना नेहमी दाबत राहतो…
नवरा बायकोला नेहमी दाबत राहतो…
मिळवती बायको नव-याला दाबत राहते…( कांही अपवाद वगळता )
श्रीमंत बायको ? गरीब नव-याला दाबत राहते…? ( कदाचित ? )
मोठा छोट्यांना दाबत राहतो…
दादा , भाई सगळ्यांनाच दाबत राहतो…”
इत्यादी इत्यादी…

दाब , दबाव , दबावतंत्र , दादागिरी वगैरे शब्द चांगलेच लोकप्रिय आहेत.

खरं खोटं देवचं जाणे.
पण साधारण पणे वरील विचारात बरेच तथ्य असावे असे वाटते.

कारण हवेचा सुध्दा दाबच मोजला जातो.
राजकारण सुध्दा ब-याच वेळा दबाव तंत्रावरच चालते असे म्हणतात.
दबावतंत्र नाही ते राजकारण कसले ?

एकंदर काय तर ?
सगळे जगचं दाबावर चालतयं का ?
होय…

अगदी वरीष्ठांचा दाब नसेल तर ?
उनाड पोरं सुध्दा अगदी बिथरून जातात.
आणी ? उभं आयुष्यच जवळजवळ बरबाद करून टाकतात.

म्हणून दाब हा हवाच हवा.अगदी प्रत्येक क्षेत्रात हवा.
आणी ? दाब ?
कमीजास्त झाला की ?
आयुष्याचे गणित सुध्दा ब-याच वेळा कोलमडून जाते.

म्हणूनच तर दाब हा हवाच हवा.
पण ? योग्य वेळी , योग्य दाब असेल तरच जीवनाला नवी दिशा मिळते.

हवेचा दाब.
पाण्याचा दाब.
सगळे जाणतात.

आपण मात्र मस्त दोस्ती करून आनंदी होऊ या.
आपल्याला नको ती दाबादाबी.
वरीष्ठ कनीष्ठ भेद विसरून खुल्लम खुल्ला दोस्त होऊ या.

*जय हरी विठ्ठल*

🚩🚩🚩🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!