non gamstop casino uk chicken road aviator non gamstop casino chicken road हक्क ? संपलेले आहेत ?? – GlobalHinduIsm
51 Views

हक्क संपलेले आहेत https://globalhinduism.online/?p=5860

*हक्क ? संपलेले* *आहेत ???*
✍️ २८९३

*विनोदकुमार महाजन*

💔💔💔💔

होय…
हक्क…
एकमेकांनी एकमेकांना भांडण्याचे हक्क…

ती लहान पणीची लुटूपुटूची लडाई , झगडे , भांडणे , रूसवे फुगवे…
आणी ?
कांही क्षणातच सगळे कांहीं विसरून ?
पुन्हा प्रेमाने एकमेकांना हाका मारणे , पुन्हा ती लपाछपी खेळणे…
पुन्हा एकमेकांवर जीवापाड प्रेम करणे…?

खरंच किती रम्य होतं ना ते बालपण ?
रूसवे फुगवे असुनही ह्रदयात प्रेम , माया , ममता , ममत्व , आत्मीयता होती.
एकमेकांना एकमेकांची ओढ होती.
कोणी चार दिवस बाहेर गावी गेले तर ? पुन्हा भेटीची हुरहुर होती , ओढ होती.
नात्यात ओलावा होता.

सगळ्यांची मनं ? जीवंत पाण्याचे वाहते झरे होते.
खळाळते झरे.
खळखळून हसणारे जीवंत झरे.

एका झाडावरच्या फांदीवर सगळेच पक्षी छान , मस्त आनंदात रहात होते , आनंदाने बागडत , विहरत होते.

रम्य ते बालपण…
पाहुण्या रावळ्यांची रेलचेल.
ती गप्पांची रात्र रात्र चाललेली महीफल.
ते मोठमोठ्याने , गर्जना करून , केले जाणारे हास्याचे कारंजे , मनसोक्त हास्याचे फवारे…

पण…???
हळूहळू दिवस सरले.
नात्यात अंतर पडू लागले.हळूहळू हे अंतरही वाढू लागले.
एकमेकांची ती ओढ , आत्मियता संपत चालली.
हळूहळू प्रेमाचे , मायेचे झरेही आटू लागले.

एका झाडावरच्या एका फांदीवर बसणारे , सदैव किलबिल करणारे ते पक्षी ?
नेहमीसाठी ? दूर उडून गेले.

कोणी या गावी , कोणी त्या गावी…
कामधंद्यानिमीत्त सगळेच दूर निघून गेले.

आत्मीयतेचे झरे आटत गेले.एकमेकांच्या भेटीची ओढ , हूरहूर पार संपून गेली.

उरल्या त्या आठवणी.
फक्त आठवणी.

मोहमायेच्या अन् पैशाच्या बाजारात सगळंच एका झटक्यात भूर…$$$ उडून गेले.

नात्यातला दूरावा ही हळूहळू वाढत गेला.
एक क्षणही ज्याच्या वाचून करमत नव्हते , त्यांच्या दहा दहा , विस विस वर्षे गाठीभेटी नाही झाल्या तरी ?
कुणाला कांहीच सोयरसुतक राहील नाही.

दूरावा वाढत गेला.
न जाने का कोण जाणे ?
मनंही भकास , हताश , उदास बनत गेली.

काय झालं समाजाला ?
काय झालं समाज रचनेला ?
काय झालं समाज व्यवस्थेला ?

माणूस ? माणसापासून दुरावला.
कायमचा.
ओढ , वात्सल्य , ममत्व संपलं.
आत्मियता संपली.

ह्रदये पण हळूहळू शुष्क होत गेली का हो ?
अगदी सगळ्यांची ?

संसाराचा फाफटपसारा वाढत गेला.
बायका पोरातही जीव रमेनासा झाला.
अगदी प्रत्येकाचा ?

मग ही मनाची उदासी आहे की उच्च कोटिचे वैराग्य ?
की जगाचे टप्पे टोणपे खाऊन , नको ते वाईट अनुभव घेऊन ,
आलेली आत्मग्लानी होय ?

कुठे हरवले ते पुर्वीचे दिवस ?
तो बालगोपालांचा रम्य मेळा आणी ?
सगळ्या चिमण्यांचा एकत्र ऐकू येणारा तो चिवचिवाट ?

काळाच्या उदरात सगळं कांहीं गडप झालं.
उरल्या त्या आठवणी…
चिमण्यांच्या आणी ? चिमण्यांच्या पिलांच्या आठवणी…??

एकमेकांना हक्काने भांडण्याचे आणी ? पुन्हा एकमेकांना मायेने बोलण्याचे ते रम्य दिवस केंव्हाच भूर्र… करून उडून गेले आहेत.

बस्स्…आता फक्त आणी फक्त…हरी हरी करत बसायचं…
ईश्वरालाच आपलंसं करून घेऊन ?
मस्त मजेत आणी आनंदात जगायचं…

जीना इसी का नाम है…

*जय हरी विठ्ठल…*

💘💘💘💘

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!