15 Views

*देह इथं अन् मन ?*
*दुसरीकडं…??*
✍️ २८१४

*विनोदकुमार महाजन*

🤫🤫🤫🤫

देह इथं अन् मन मात्र दुसरीकडं…

सगळ्यांच अगदी असंच असतं.

आपण आपल्या कामात असतो अन् मन मात्र सगळीकडे सैरभैर फिरत असतं.
अगदी गावभर सुद्धा भटकून येतं आपलं मन.
ते सुध्दा एका झटक्यात.

आपल्या मराठमोळ्या ग्रामीण कवियत्री बहिणाबाई चौधरी सुध्दा म्हणतात ना ?
” मन वढाय वढाय…”

काम करत करत आपण म्हणतो , ” उद्या काय काशीला जायचा बेत आखायचा का ? ”
आणी मग मन एका झटक्यात काशीला पोचतं सुध्दा.
काशी विश्वनाथाच दर्शन सुध्दा घेतलं मनाने.
देह काशीला जेंव्हा जायचा असेल तेंव्हा जाईल.
पण मन मात्र एका फटक्यात काशीची यात्रा करून आलं सुध्दा.

अहो श्रीकृष्ण सुध्दा देहाने एक ठिकाणी असतो.पण मनाने मात्र ? सतत राधे जवळ.
असं कोणतं दिव्य प्रेम आहे त्या राधेत…?
ज्यामुळे प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्ण सुध्दा तिच्या साठी वेडा झाला.

असो…
तर आपलं मन भरकटायला नको.
पुन्हा मन या विषयावर येऊ या.

मन फार चंचल , मन फार विचित्र.
मनावर अनेक म्हणी सुद्धा प्रचलित आहेत.

” मन चिंती ते वैरी ना चिंती…”
” मन मेरा लागा यार फकिरी में…”
” मेरा मन बडा उदास है…”
इत्यादी इत्यादी.

अहो पण मन म्हणजे नेमकं काय आहे ? मन राहतं कुठं ?
ते जरी सतत सैरभैर फिरत असलं तरी ते आपल्या जवळच असतं ना ?
पण नेमकं कुठं ?

तर आपल्या शरीरात एक आत्मा वास करत असतो.
चैतन्य रूप , चिरंतन , चिरंजीव…
दिसत नाही पण जाणवतो… आत्मा…
*आत्माराम…*
अगदी सगळ्यांचा आत्मा.
अगदी पशुपक्षांचा सुद्धा.

आत्मा आणी परमात्मा यांची अक्षय भेट म्हणजे समाधी…
असो…

तर हा आपला आत्मा आपल्या हृदयात राहतो.सतत.
आणी तिथेच या अदृश्य आणी चंचल मनाचे स्थान असते.

पशुपक्षांना मन असतं का ?
हो…
त्यांना ही मन भावना असतात.
आपली संवेदना जागृत असेल तर आपल्यालाही त्यांच्या मन भावना , सुखदुःख समजत.

मन हलकं करणं , मन मोकळं करणं…
असेही शब्द प्रयोग वापरतात.

तर पशुपक्षी सुद्धा आपल्यापाशी मन हलकं करतात.अगदी मनं मोकळं सुध्दा करतात.
फक्त आपल्याला त्या त्यांच्या भावना समजल्या पाहिजेत.
अहो ती मुकी बिचारी गप्पा सुध्दा मारतात आपल्याशी.
होय,
माझा अनुभव आहे.

आमच्या घरी एक गोमाता होती…
मला सारखी बोलायची.
तिच्या मृत्यूनंतर सुद्धा ती माझ्या स्वप्नात आली आणी मला एका स्र्तिच्या अतिशय सुंदर आवाजात बोलली…
” अरे कीती वेळ झाला मी तुला शोधते आहे.तु कांहीं सापडतच नव्हता.मी आता स्वर्गाला चालली आहे , हे मी तुला सांगायला आली आहे . ”

अहो आपलं मन शुद्ध , स्वच्छ असेल तर देवीदेवता सुद्धा आपल्याशी खूप प्रेमाने बोलतात हो.
माझी आई कोल्हापूरची साक्षात जगद् अंबा पण मला स्वप्नात येऊन खूप गोड आणी सुंदर आवाजात बोलत असते.
त्याचं शब्दात काय वर्णन करू ?

असो…
तर एकंदर काय तर ?
आपलं मन जे आहे ना ?
सतत सैरभैर फिरनार ?
त्याला कायमस्वरूपी सद्गुरूंच्या आणी ? ईश्वराच्या पवित्र चरणकमलांवर कायमस्वरूपी बांधून टाका.
मग बघा…
काय त्या मनाची बिशाद आहे सैरभैर पणे इकडे तिकडे पळण्याची ?

एकदा तुम्हाला हे जमलं की मग तुमचा जीवन प्रवास अगदी सोपा होऊन जाईल.
आणी तुम्हाला मग जे हवं आहे ते सगळंच भेटेल…
आणी मग…?
तुमचं मन ?
आनंदाने टनटना उड्या मारेल.

*बघा प्रयत्न करून* *जमतंय का ते ?*

अरे तुम्ही मला म्हणालं ,
” हा काय दिव्यात्मा वगैरे अवतरलाय काय धरतीवर ? ”
अहो दिव्यात्मा वगैरे कांहीं नाही.
आत्मा शेवटी सगळ्यांचा सारखाच ना .?
आणी ?
धरतीवर येणारे प्रत्येक देहधारी शेवटी दिव्यात्माच आहेत ना ?
फक्त ते स्वतः ची खरी *ओळख विसरलेत.*
कारण त्यांचं मनचं स्थिर नाहीये.
ते उगाच भरकटतयं इकडे तिकडे.
*येडे जीव…*
स्वतःच्याच आत्म्याचा विसर पडलेली दिशाहीन माणसे…??

मन चंगा तो कठौती में गंगा…

शेवटी एकाच भगवंताची सारी लेकरे…देह वेगवेगळे पण आत्मा एक…चौ-यांशी लक्ष योनीचे आत्मतत्त्व ही एकच…आणी सगळ्यांचा अचूक हिशोब ठेवणारा , प्रभू परमात्मा साकार निराकार भगवंतही एकच…

एक सुर्य… अनंत सुर्य किरणे…

*जय हरी विठ्ठल*

🙏🙏🙏🕉️🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!