252 Views

 

*भगवंत कुठे राहतो ??*
✍️ २८३१

*विनोदकुमार महाजन*

🌞🌞🌞🌞

बरेच जण प्रश्न विचारतात की भगवंत कुठे राहतो ?

कण कण में है भगवान
रोम रोम में बसा है मेरा प्यारा प्यारा राम …
कंकर कंकर में है मेरा महादेव शंकर…
जळी स्थळी काष्ठी पाशाणी सगळीकडेच तो आहे.
प्रत्येक सजीवातही तोच आहे.सजीव निर्जीव एक भगवंत रे…
साकार ही तोच आहे , निराकारही तोच आहे.
संपूर्ण ब्रम्हांडाला पुरून उरलेला तो भगवंत आहे.
सुर्य चंद्र जल अग्नी वायू प्रत्येक ठिकाणी तोच आहे.

तरीही कांहीं अज्ञान जीव विचारतात , भगवंत कुठे आहे ?
प्रश्न विचारणाराच्या ह्रदयातही तोच राहतो.
निराकार श्वासाने निराकार ब्रह्म आणी आपलेच निराकार आत्मतत्त्व यांना जोडतो.

एक श्वास…
सो… अहम् या महान ईश्वरी तत्वाशी जोडतो.

तुझे आहे तुजपाशी परी जागा चुकलाशी…
अशी दयनीय अवस्था.
मग शोधत फिरतो मठ मंदिरी…
पण तो तर बसतो आपुल्या अंतरी…

अनादी अनंत भगवंत
आदी मी…अनादी मी…
अनंत मी…
पिंडी ते ब्रम्हांडी…
सगळीकडे एकच तत्त्व.

सत्य सनातन धर्म हेच शिकवतो…
सत्य हाच ईश्वर , सनातन हाच ईश्वर…

तो तर राहतो अंतरी
मग का फिरशी गिरी कंदरी ?

फिरत्या चाकावरती देशी
मातीला आकार
विठ्ठला तू वेडा कुंभार

कोणतं फिरतं चाक ?
सृष्टी चक्राच फिरत चाक ?
सजीव सृष्टी च फिरत चाक ?
चौ-यांशी लक्ष योनिचं फिरत चाक ?
देह बदलत बदलत राहणार फिरत चाक ?

एवढं भगवंताच रहस्य भारी , एवढं भगवंताच गणित भारी , एवढं भगवंताच नियोजन भारी…

तरीही अल्पबुध्दी , अल्पजीवी मनुष्य प्राणी विचारतो ?
भगवंत कुठे आहे ?
देव कुठे राहतो ?
देव कुठे शोधायचा ?

चौ-यांशी लक्ष योनी बध्द आहे…
पण त्यातील एकमेव मनुष्य प्राणी ?
मुक्त आहे.
ब्रम्ह तत्व शोधून नराचा नारायण होण्यासाठी भगवंताने त्याला ज्ञान दिले आहे.
सत्य शोधण्यासाठी बुद्धी दिली आहे.
अंतिम सत्यापर्यंत पोचण्यासाठी चैतन्य दिले आहे.

तु ही भगवंत आहे रे वेड्या जीवा.
मी ही भगवंत आहे.
तु ही राम.
मी ही राम.
म्हणूनच म्हणतो आपण ?
रामराम…
तुझ्यात राम
माझ्यात राम…
संपूर्ण ब्रम्हांडात सुध्दा
वसतो राम…
आपल्या आतही आहे
आत्मा राम…

शोधा म्हणजे सापडेल.
भगवंत सापडेल.
भगवंताच स्थानही सापडेल.

हे सगळे खरे , सत्य ज्ञान देणारा ?
एकच धर्म ?
केवळ सत्य सनातन धर्म…

म्हणूनच अज्ञान सोडून सत्याकडे वळू या.
सत्य सनातन धर्माशी एकरूप होऊन जाऊ या.

ईश्वर निर्मित सत्य सनातन धर्म की जय.

🌝🌝🌝🌝

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!