80 Views

*तुझी काळजी ? देवच* *करतोय रे…!!*
✍️२८४५

*विनोदकुमार महाजन*

🌹🌹🌝✅

होय…
अगदी प्रत्येक जीवाची काळजी ? तो प्रभू परमात्मा करतो आहे.
निरंतर करतो आहे.

प्रत्येक सजीवाचा जन्मही त्याच्या हातात , आणी प्रत्येकाचा मृत्यू सुध्दा ? त्याच्याच हातात.

सगळ्या विश्वाचा पसारा तो चालवतो.अथक आणी अव्याहतपणे.

कोणत्या जीवाचा , कुठे , कधी , कसा आणी कोणत्या योनिमध्ये जन्म होणार आहे , आणी ? कोणाचा कधी , कुठे , कसा ? मृत्यू पण होणार आहे ?
याचा अचूक हिशोब त्याच्याकडे आहे.
अचूक टायमिंग त्याच्याकडे आहे.

त्याच टायमिंग कधिही चुकत नाही.
त्याच्या अचूक टायमिंग प्रमाणे अगदी चंद्र सुर्य सुध्दा अचूकपणे उगवतात आणी मावळतात ?

त्याच सृष्टी चक्र अचुकपणे चालवण्यासाठी , सजीव सृष्टी चक्र चालवण्यासाठी.

चंद्र सुर्य कधी म्हणतात का हो ? की मी आज सुट्टीवर जाणार आहे म्हणून ?
मी आज फार दमलो थकलो रे बाबा , आजच्या दिवस मी पूर्ण विश्रांती घेतो…
असं कधी ते म्हणतात का ?

नाही.
कारण त्यांना अचूकपणे सृष्टीचा गाडा चालवायचा आहे.
प्रत्येक जीवाची त्यांना काळजी आहे.
अगदी प्रत्येकाच्या खाण्यापिण्याची पण त्याला काळजी आहे.

म्हणूनच म्हणतात ना ?
” *चोच आहे तिथे ? चारा* *आहे. “*

*प्रत्येक जीवाचा करीतो* *सांभाळ.*

अगदी तुमची माझी सुध्दा तो काळजी करतो.
अगदी रात्रंदिवस काळजी करतो.

म्हणूनच तर आपल्याला वेळच्या वेळी तहान लागते , भूक लागते.झोप सुध्दा त्याच्या इच्छेनेच लागते.
अगदी प्रत्येकाला.

मग ?
किती छान , सुंदर आयुष्य दिलंय बरं त्या भगवंतानं आपल्याला.
आपली किती चिंता करतो ?
अगदी पावलोपावली.

“*तुझी चींता त्याशी ?*
*सर्व आहे. “*

आणी एखादा खुळा जीव ?
एखादा खुळा मनुष्य प्राणी ?
मोठ्या अहंकाराने विचारतो…?
” *कुठाय रे तो भगवंत* *दाखव बरं* *मला , तरच विश्वास* *ठेवतो मी . “*

तुझे आहे तुजपाशी परी जागा चुकलाशी…
वेड्या जीवा.

*तुझी चींता तोची वाहतो* *आहे.*
*रात्रंदिवस…*

तुझा जन्म जसा त्याच्या हातात आहे ?
तसाच ? तुझा मृत्यू सुध्दा ? कुठे आहे ? कसा आहे ? कधी आहे ? पुढचा जन्म कोणत्या योनीत आहे ?
याचा अचूक हिशोब त्याच्याकडे आहे.
मग ?
” *आता कशाला फुकाची* *बात…बघ* *उडून चालली* *आयुष्याची रात…”*

मित्रांनो ,
सगळं गणीत , आपल्या आयुष्याच सगळं *आयुष्याच पॅकेज*
त्याच्याच हातात आहे.

मग उगीचच कशाला ?
माझं माझं म्हणून रात्रंदिवस उर बडवून घ्यायचा ?
माझं घरं , माझा पैसा , माझी प्राॅपर्टी , माझी लेकरं बाळ ?
*माझं माझं कबाड ओझं*
वेड्या जीवा…
हे देह सुद्धा तुझा नाही.
त्याचं बोलावणं आलं की ? सगळं एका सेकंदात सोडून जायचं आहे…आणी त्याच्या शक्तिशी ? एकरूप व्हायचं आहे.

मगं मागं उरतं तरी काय ? मागं उरतं ते सत्य…सत्याचं आणी सत्य सनातन धर्माचं कार्य…
त्याची किर्ती दिगंत राहते.

म्हणूनच तर म्हणतात ना ?
” *त्याच्या इच्छेशिवाय* *काडी* *सुद्धा हालत नाही. “*

अगदी वारा , ऊन , पाऊस सुध्दा ? अगदी सगळी पंचमहाभूते सुद्धा ? त्याचे इच्छेनुसार च चालतात .

मग एकंदर काय तर ?
*तुझी चींता त्याशी सर्व* *आहे…*
त्याच्या चरणांवर सर्वस्व समर्पण केल की ?
आपण सुटलो.

*जय हरी विठ्ठल*

🙏🙏✅🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!