97 Views

*स्वप्न दृष्टांत…?*
✍️ २८४८
*विनोदकुमार महाजन*
🫣🫣🫣🫣
स्वप्न आणी स्वप्न दृष्टांत ,
हे जवळ जवळ प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्वपूर्ण भाग असतो .
वेगवेगळ्या स्वप्नांचे वेगवेगळे अर्थ असतात.
यालाच आपण स्वप्न दृष्टांत ही म्हणतो.
पण ब-याच जणांना अनेक वेळा स्वप्न दृष्टांताचा अर्थबोध होत नाही.
ब-याच वेळा अगदी निरर्थक स्वप्ने पडतात.
स्वप्नात कशाचा कशाला ताळमेळ नसतो. अगदीच विचित्र स्वप्ने पडतात.
तर ब-याच वेळा ,
” *मनी वसे ते स्वप्नी* *दिसे…”* असे ही असू शकते.
ब-याच वेळा जे आपण दिवसा मनात चिंतीतो , मनात जे विचार करतो , ब-याच वेळा त्याचा संबंध ही स्वप्नाशी असतो.
पण स्वप्न दृष्टांत नेमके कशे व काय असतात , ते पाहूया.
अनेक वेळा असे होते की , आपण ज्याच्यावर दिवसा अथवा जागृत अवस्थेत कधी विचारही केलेला नसतो , अशी अनेक असंबद्ध स्वप्ने आपल्याला पडत असतात.
ब-याच वेळा आपल्याला त्याचा नीटसा अर्थबोध ही होत नाही , आणी मग आपण गोंधळून , गांगारून अथवा घाबरून जातो.
स्वप्नात आग दिसणे , पाणी दिसणे , साप दिसणे , भूते खेते दिसणे अथवा मृत्यू दिसणे अशा अनेक प्रकारची स्वप्ने पडतात.
आणी प्रत्येक स्वप्नांचा वेगवेगळा अर्थ ही असतो.
कांहीं स्वप्ने ही अत्यंत भितीदायक व भेसुर असतात.तर अनेक स्वप्ने ही आनंदीत करणारी पण असतात.
अनेक वेळा स्वप्नात धनलाभ होणारे अथवा भाग्योदय होणारे संकेत ही मिळतात.
आपण कांही स्वप्नांचा गूढ अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करतो , पण त्याचा निटसा अर्थ आपणास समजू शकत नाही. त्याचा अर्थ आपण शोधत बसतो.
ब-याच वेळा आपले पूर्वज आपल्या स्वप्नात येऊन बोलतात.तर ब-याच वेळा आपले मृत्यू पावलेले मित्रही स्वप्नात येऊन संभाषण करतात .
ते आपल्याशी आत्म्याद्वारे संपर्क करून , आपणास संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात.
पण आपणास त्याचा अर्थ बोध न झाल्यामुळे आपण बुचकळ्यात पडतो.
आपले कांही मृत नातेवाईक , पितर , मित्र आपणास भविष्यातील अनेक चांगल्या कींवा वाईट गोष्टींचा अथवा भविष्यात घडणाऱ्या शुभ अशुभ घटनांचा संकेत आपणास स्वप्नात येऊन देत असतात.
आणी हे थोतांड नव्हे अथवा अंधविश्वास ही नव्हे तर एक वास्तव आहे.सत्य आहे.
अनेक वेळा अतिशय वाईट स्वप्ने आपला सतत पाठलाग करत असतात.
एखादा पुर्वज सर्पयोनीमध्ये , पिशाच योनिमध्ये अडकला असेल आणी त्याला आपल्याकडून मोक्ष अथवा गती हवी असेल तरी असे आत्मे आपणास स्वप्नात संपर्क करत असतात.
पितृदोषांचे सुध्दा अनेक संकेत स्वप्नात मिळतात.
आत्म्यांना आपले विचार व्यक्त करायला अथवा आपल्याशी संपर्क साधायला , त्यांचे देहाचे माध्यम संपलेले असते , म्हणून ते स्वप्न दृष्टांत देऊन आपले विचार अथवा मनोगत व्यक्त करत असतात.
कांहीं वेळा कुणीतरी आपल्यावर ” ब्लैक मैजीक ” करत असते. ते ही स्वप्नातून आपल्याला दिसते , जाणवते.
अशा अवस्थेत भयावह व अनेक असंबद्ध स्वप्ने पडतात.
तर अनेक वेळा आपल्याला अनेक देवीदेवतांची स्वप्ने पडतात.ब-याच वेळा आपले सद्गुरू स्वप्नात येऊन आपल्याला मार्गदर्शन करत असतात.भविष्यकालीन अनेक योजना ते स्वप्नातून सांगत असतात.
आपले आत्मतत्त्व किती जागृत आहे यावर तुमच्या सद्गुरूंचे अथवा ईश्वराचे , ईश्वरी शक्तिंचे स्वप्नातील मार्गदर्शन अवलंबून असते.
जेवढी तुमची श्रद्धा उच्च कीटीची असेल तेवढी जास्त ईश्वरी शक्ती कडून प्रत्यक्ष अथवा स्वप्नातून तुमच्या वर कृपा होत असते व ईश्वरी वरदान अथवा गुरूकृपा प्राप्त होत असते.
झोपेमध्ये देह निद्रिस्त असला तरी आपली चेतना व आत्मतत्त्व जागृत असते , त्यामुळे अशा स्थितीमध्ये अलौकिक , पारलौकिक शक्ती आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतात.
विशेषतः पहाटे तीन ते पाच या ब्रम्ह मुहुर्तावर विशेष अलौकिक शक्ती आपल्याशी संपर्क साधून आपले पुढील आयुष्याची दिशा ठरवत असतात.
म्हणूनच या वेळी अनेक देवीदेवतांचे अलौकिक दर्शन आपणास घडत असते.व ते परम हितकारक व भाग्य वृध्दी साठी उपयोगी असते.
मला स्वतःला नेहमी स्वप्नात अनेक देवीदेवतांची दर्शने तर होतातच , अनेक वेळा पुढील मार्गदर्शन अथवा भविष्यात घडणाऱ्या अनेक घटनांचे संकेत ही मला देवीदेवतांकडून मिळतात.
माझी अनेक स्वप्ने प्रत्यक्षात उतरेलीली अथवा खरी झालेली मला नेहमीच अनुभूती येते.
माझे सद्गुरू आण्णा यांनी गुरू दत्तात्रेयासकट मला दर्शन देऊन माझ्या डोक्यावर वरदहस्त ठेवला आहे.शिवाय शेगांवचे गजानन महाराज , सज्जन गडावरील कल्याण स्वामी महाराज यांनी माझ्या डोक्यावर वरदहस्त ठेवला आहे.
मला नेहमी भविष्यकालीन अनेक घटना स्वप्नात दिसतात.
आजारी व्यक्तींना अशीच अनेक चित्रविचित्र तर कधी भयावह स्वप्ने ही पडत असतात.पण त्याचा संबंध आपल्या देहातील वेदनेमुळे येत असतो.
तर ब-याच वेळा आजारी व्यक्तींना भविष्य कालीन चांगल्या वाईट गोष्टींचा ही स्वप्नं दृष्टांत होत असतो.
विशेषतः एखाद्याचा मृत्यू जवळ आला असेल तरी सुद्धा त्याला तसे स्वप्न दृष्टांत मिळतातच.
स्वप्न दृष्टांततावर फार मोठा लेख लिहीता येईल अथवा मोठे पुस्तक प्रकाशित करता येईल.
( कोणी प्रकाशक असल्यास माझ्याशी संपर्क साधावा )
वेळ मर्यादेमुळे हा लेख इथेच थांबवतो आहे.
माझ्या खालील व्हाट्सअप नंबर वर संपर्क करावा.
व्हाट्सअप नंबर
+91 8329894106
💐💐💐💐
