41 Views

*आरोग्य आणी* *मन:स्वास्थ्य : – यांचा* *संबंध काय ??*
✍️ २८४२
*विनोदकुमार महाजन*
🤫🤫🤫🤫
खरंच ,
आरोग्य आणी मन:स्वास्थ्य यांचा संबंध आहे का ?
अगदी खोलवर संबंध आहे का ?
अर्थात…होय…
आरोग्य व मनःस्वास्थ्य यांचा अगदी घनिष्ठ संबंध आहे.
हे त्रिवार सत्य आहे.
उत्तम आरोग्य असेल तर हमखास उत्तम मन:स्वास्थ्य तर राहतेच.
आणी उत्तम मन:स्वास्थ्य हे सगळ्या यशाचे रहस्य आहे.उत्तम मन:स्वास्य्थामुळे अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करता येतात.
*ठंडा दिमाग नामुमकीन* *को भी* *मुमकीन में बदल देता* *है…*
म्हणूनच प्रत्येकाचे , होय अगदी प्रत्येकाचे, आई वडील, आपल्या मुलांचे बालपण हे अतीशय सुखा समाधानात आणी आनंदात घालवण्यासाठी रात्रंदिवस धडपडत असतात.म्हणूनच ते अहोरात्र काळजीपूर्वक पणे बालपणी आपल्या मुलांचा सांभाळ करत असतात.
म्हणूनच याला बालकडू असेही म्हटले जाते.
बालकडू उत्तम दिले तर ? आयुष्य भर ? उत्तम मन:स्वास्थ्य राहते.आणी ? संपूर्ण आयुष्यच अगदी आनंदात जाते.
निदान त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये , हाडामध्ये आयुष्यात येणारे , अत्यंत दुर्धर प्रसंग लिलया पेलून नेण्याची क्षमता व शक्ती येते.
म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात बालसंस्कार आणी बालकडू अत्यंत महत्त्वाचे असते.
म्हणूनच या वयात आपल्या प्रत्येक लेकराला आईवडील हे अगदी तळहाताच्या फोडासारखे जपत असतात.जेणेकरून ?
त्याचे उभे आयुष्यच सुखात जावे.
बालपणीच्या आपल्या लेकरांच्या अजानतेपणाच्या कांहीं चूका असतील तर ? त्यावरही पांघरूण घालून , आई वडील त्या लेकराचे मन: स्वास्थ्य टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.
तात्पर्य काय तर ?
बालपणी मन:स्वास्थ्य उत्तम असेल तर ?
जवळ जवळ उभे आयुष्यच सुखात जाते.
पण ? जर बालपणीच एखाद्याच्या मनावर अत्यंत भयावह असे कुठाराघात झाले अथवा ? पालकांकडूनच असे जीवघेणे कुठाराघात , वारंवार व हेतुपुरस्सर केले गेले तर ?
अशा दुर्देवी मुलांचे उभे आयुष्यच जवळजवळ होरपळून निघते.
आणी जवळपास ? त्याचे संपूर्ण आयुष्यच बरबाद होऊन जाते.
कुसंगती , व्यसनाधीनता , गुन्हेगारी , बेफिकीरी अशा मुलांमध्ये अनायासे वाढत जाते .
कारण बालपणी एखाद्याच्या मनावर जर खोल परिणाम झाले तर ? कदाचित त्या संबंधित व्यक्तिचे उभे आयुष्य ही पार उध्वस्त होऊ शकते.
मग अशी मुले नैराश्याने ग्रासली जाऊन आत्महत्येपर्यंत सुध्दा जावू शकतात.
बालपणी एखाद्याची अन्नान्न दशा असेल , वर पुन्हा मनावर सतत कुठाराघात होत असतील तर ? अशी मुले कदाचित अत्यंतिक मानसिक छळवादामुळे अगदी वेडी सुद्धा होऊ शकतात.
आणी मग ? वेडेपणाच अगदी सैरभैर होऊन वाट्टेल ते करायला लागतात.
ब-याच वेळा ते स्वतः काय करतात याचे भानही त्यांना नसते.
पूर्ण शुद्ध हरपणे , असे याला म्हणतात.
आणी मानसिक स्वास्थ्य हरवलेला व्यक्ती सैरभैर होऊन चुकावर चुका करत राहतो.
अशा अवस्थेत जर त्याला खंबीर मानसिक आधार मिळाला तर ?
कदाचित त्याचे आयुष्य सुधारले ही जावू शकते.
पण ? अशा त्याच्या भयंकर अवस्थेत सुध्दा , एखाद्याचा भयंकर क्रूरपणे , सामुहिक मानसिक छळवाद केला जात असेल ? ते ही ? स्वकियाकडूनच ?
तर ?
अशी मुले सुधरायच्या आणी सावरायच्या ऐवजी , संपूर्ण पणे बिथरली जातात आणी ? साहजिकच आपले उभे आयुष्यच उध्वस्त करून टाकतात.
मग याला जबाबदार कोण ? तो स्वतः ? की त्याचा बालपणीचा सामुहिक छळवाद ?
आणी हा जीवघेणा मानसिक छळवाद अगदी आयुष्यभर त्या संबंधित व्यक्तीच्या मनावर व बोकांडावर बसून ? आयुष्यभर त्याला ठेचत राहतो.
त्याच्या मानगुटीवर बसलेले मानसिक छळवादाचे भयंकर क्रूर भूत ? आयुष्यभर त्याचा आतल्या आत भयंकर मानसिक छळवाद करत राहते.
हे असे का ?
हा प्रश्न सतत त्याला अगदी आयुष्यभर छळत राहतो.
आणी मग ?
ब-याच वेळा दुर्देवाने अशी हतबल मुले विकृत सुध्दा होऊ शकतात.
म्हणूनच बालवयातला मानसिक आधार हा अत्यंत महत्त्वाचा असतो.त्याने उभे आयुष्य घडते.
आणी बालपणी झालेला भयंकर मानसिक छळवाद एखाद्याचे आयुष्य सुध्दा उध्वस्त करू शकतो .
म्हणूनच आरोग्य आणी मन: स्वास्थ्य याचा अगदी खोलवर संबंध असतोच असतो.
मन:स्वास्य्थ हरवले तर ? अनेक जीवघेणे आणी आयुष्य भर पुरतील असे अनेक जीवघेणे आजार सुध्दा होऊ शकतात.
त्यातून सावरणे व पुन्हा आयुष्यात उभे राहणे अथवा नवी भरारी घेणे म्हणजे ? जवळजवळ अशक्य होऊन जाते.
आणी मग सुरू होते ती त्याच्या आयुष्यासाठी ची एक भयावह अशी एकाकी लढत.
पण कदाचित…
अशा भयावह अवस्थेतून सावरूनही एखादा उच्च कोटीला पोचला असेल अथवा उंच भरा-या घेत असेल तर ? तो खरोखरीच कौतुकास्पद च नव्हे तर ? एक ईश्वरी चमत्कार होय.
आणी ? जर ?
असा एक जबरदस्त ईश्वरी चमत्कार होऊनही त्याचे कौतुक करणे तर दूरच , त्याचा हेतुपुरस्सरपणे कांही अज्ञात व्यक्ती कडून पुन्हा मानसिक छळवादच केला जात असेल तर ?
त्याची काय अवस्था होईल ?
हे अती भयानक आहे.
कदाचित अशा अनेक सत्य घटना समाजात असू शकतील.
काळाच्या उदरात त्या सदासाठी गडप ही झालेल्या असतील.
पण ? सत्य हे सत्यच असते.
ते जमिनीत कितीही खोलवर गाडले अथवा सत्याचा आवाज जमिनीत कितीही खोलवर गाडला तरी ?
ईश्वरी इच्छेने सत्य जमीन फाडून एक दिवस नक्कीच बाहेर येते.
आणी तो दिवस कदाचित ?
रावण , दुर्योधन , कंस , हिरण्यकश्यपू , जरासंध , कालिया अशा अनेक भयंकर मानसिक विकृतीच्या लोकांसाठीचा ?
अंत ही असु शकतो.?
म्हणूनच एखाद्याचा मानसिक छळवाद करण्यापूर्वी , विशेषतः त्याच्या बालवयात , छळवाद करणाराने शंभर वेळा विचार करायलाच हवा.
एखाद्याच्या उध्वस्त आयुष्यात ही ईश्वरी इच्छेने कदाचित नवीन बहार ही येऊ शकते.
फिनिक्स पक्षी राखेतुनही पुनर्जन्म घेऊ शकतो.
दुर्देवाने वरीलपैकी अनेक घटना समाजात सत्य घटनेवर आधारित असू शकतील .
एखाद्याच्या जीवनात असे भयावह प्रसंग येत असतील तर ?
त्यांनी कुणाचा आधार शोधायचा ?
समाजात असे असह्य जीवन जगणारी माणसं किती आहेत ?
हे ईश्वरालाच ठावे.
*जय हरी विठ्ठल*
🚩🚩🚩🕉️
