non gamstop casino uk chicken road aviator non gamstop casino chicken road मनावर प्रेमाची एक फूंकर हवी… - GlobalHinduIsm
74 Views

मनावर प्रेमाची एक फूंकर हवी https://globalhinduism.online/?p=5855

*मनावर फक्त एक फूंकर* *हवी….*
✍️ २८९१

*विनोदकुमार महाजन*

🫣🫣🫣✅

अख्ख जगच सद्या फारच बिकट अवस्थेतून जात आहे की काय असं वाटतंय.

विशेषतः संपूर्ण जगात विखुरलेला मनुष्य प्राणी.

दु:ख , दु:खातिरेक , दुःखाचा आगडोंब जणू सगळीकडेच उसळलेला दिसतोय.

आणी अशात , अशा भयंकर परिस्थिती मध्ये हवा असतो तो एक खंबीर आधार.खंबीर मानसिक आधार.
आणी ?
मनावर घातली जाणारी… एक हळूवार फुंकर.

पण वरचेवर मनुष्य नावाच्या प्राण्याला झालंय काय तर ? जवळजवळ अख्खा मनुष्य प्राणीच सगळीकडे अगदी कोत्या मनाने आणी कोत्या विचारसरणीने वागतो आहे की काय ? असे सहज वाटू लागले आहे.

इतरांच्या दु:खाचं त्याला जवळजवळ कांहीही घेणंदेणं नाही , अशी भयंकर सामाजिक स्थिती बनत चालली आहे.

मग अशा भयंकर आणी विचित्र स्थितीमध्ये कोण कुणाचा आणी कोण कुणाच्या मनाचा विचार करणार ?

मग दुस-यांच्या दु:खात त्याच्या मनावर फूंकर घालणे तर ? जवळजवळ दूरापास्तच.
एक मायेची फूंकर.एक आत्मियतेची फूंकर.

हल्ली कुणी कुणाच्या मनाचा विचार करायला तयार नाही.एकमेकांना एकमेकांच्या सुखदुःखाशी कांहीही घेणंदेणं नाही , असे सामाजिक विदारक चित्र सर्रास पणे जाणवते आहे.

आणी हे सत्य आहे.

लोकसंख्या वाढली पण माणूस कोता झाला.
माणसाच्या आत आत्मा असतो , याचाच जणू माणसाला विसर पडला.

आत्मा असून आत्मा मेलेली आत्मियता शून्य माणसे.
संवेदना शून्य समाज.

परदु:ख शीतल असते , हे एक वेळ समजण्यासारखे आहे.
पण ? एखादा दु:खातिरेकाने तडफडतो आहे , दुःखातिरेकाने गलितगात्र झाला आहे , तरी सुद्धा त्यांच्याबद्दल समाजाला अथवा समाजातील एखाद्या घटकाला त्याच्याशी कांहीही घेणंदेणं नसावं ? खरंच किती अधोगती कडे गेला ना समाज ?

नैतिकता वगैरे संपली , हे एक वेळ समजू शकतो पण ? सामाजिक आत्मियता सुध्दा संपली ?
एवढा संवेदनाशून्य आणी बोथट समाज कसा झाला ?

उलटपक्षी एखादा दु:खातिरेकाने तडफडत असेल तर ? आनंदाने पेढे वाटणारांची संख्या सुध्दा झपाट्याने वाढत आहे ?
हा कसला विकृत समाज बनत चालला आहे ?
आणी विशेष म्हणजे याला ? अशा भयंकर विकृतीला निदान आज तरी काही उत्तर सापडत नाही.

एखाद्याच्या मयताला भाड्याने माणसे आणावी लागतात , इथवर ठीक आहे.
पण ?
मयताच्या टाळु वरील लोणी खाणारे अर्थात ?
एखाद्याच्या मृत्युचे सुध्दा भांडवल करणारे समाजात आज पहायला मिळतात ? हे ही फार मोठे आश्चर्य आज पावलोपावली बघायला मिळते आहे ?

मरणा दारी आणी तोरणा दारी भेदभाव करू नये , अशी एक जुनी म्हण आहे.
पण अलिकडे मरणादारी आणी तोरणादारी पण भांडणाचा आगडोंब उसळलेला आपणाला जागोजागी पहायला मिळतो आहे ?

दुसऱ्याच्या दु:खात आधार देणारा सुसंस्कृत समाज एकदम एवढा असंस्कृत , असभ्य , संवेदनाशून्य का बरे बनत चालला ?
हा नक्कीच विचार करायला लावणारा मुद्दा आहे.

मग अशा भयावह परिस्थिती मध्ये खरोखरीच एखाद्याच्या दु:खात त्याला आधार देणारा भेटणे दूरच ?
एखाद्याच्या मनावर दुःखद प्रसंगी फूंकर घालणारा तरी थोडाच भेटणार आहे ?

दु:खद प्रसंगांमध्ये मनावर घातली गेलेली एक प्रेमाची फूंकर सुध्दा जीवनाला एक नवी उभारी तर देतेच .पण या उभारीतून सुध्दा बिघडलेले आयुष्य घडायला मदत होते.
आणी हीच उभारी ?
आयुष्याला एक नवी दिशा सुध्दा देऊ शकते.

पण ???
अशी मनाला उभारी देणारी मोठ्या मनाची माणसं जवळजवळ या दुनियेमधून नामशेष झाली आहेत असं वाटतंय.

निदान माझं तरी हेच मत आहे.आणी ? अनुभव सुध्दा.
कदाचित तुमचे मत आणी अनुभव सुध्दा वेगळे असू शकतील.

मनुष्य प्राणी धनाने मोठा होतो आहे पण ?
मनाने ? भिकारी , कंगाल होत चालला आहे , एवढं मात्र नक्की खरे आहे.

मनाची श्रीमंती संपली.
आणी जागोजागी मनाची गरीबी वाढत चालली.
धनाने श्रीमंत मनाने कंगाल , ही सामाजिक विदारकता बनत चालली.

याला कारणेही अनेक आहेत.
त्यातलं महत्वाचे कारण म्हणजे ?
पैसा हाच देव झाला.
आणी ?
खरा देवही बाजारात मांडला.

देवाच्या दर्शनबारीमध्ये सुध्दा ? पैसाच देव ठरला.
जो पैसा देतो ? त्याला आधी दर्शन ?

असो…
*कालाय तस्मै नमः*

🙏🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!