77 Views

*देवाने किती सुंदर देह* *दिलाय…!!*
✍️ २८६६
*विनोदकुमार महाजन*
🌞🕉️🌹🌹
खरंच ,
देवाने किती सुंदर देह दिलाय ना आपल्याला ?
आपल्या सगळ्यांना ?
जर त्याने आपणाला एवढा छान , सुंदर देह दिलाय तर तो ?
ईश्वर किती सुंदर असेल ?
त्याचे मन किती सुंदर असेल ?
सृष्टी रचनेचं खरंच त्याचं सगळं आश्चर्यच आहे ना ?
म्हणूनच म्हणतात ना ?
” *देवाची करणी अन्* *नारळात पाणी…”*
एक मराठी गायक किती आनंदाने गाणे म्हणतो आहे ,
” *देह देवाचे मंदिर , त्यात* *वसे रे , आत्मा* *हा सुंदर …”*
खरंच…भगवंताची रचना किती सुंदर आहे.
पशू पक्षी वेली झाडे…
सगळी सजीव सृष्टी…
आपल्या संवेदना जागृत असतील तर ?
सगळे सजीव आपल्याशी बोलताहेत , संवाद साधताहेत , असं आपणास नक्कीच जाणवेल.
अगदी झाडे सुद्धा आपल्याशी बोलतात हो.
त्यांनाही आत्मा आहे.त्यांना ही मन भावना असतात.
आपल्या मुळातून ते अन्न पाणी शोषून घेतात.आणी पानातून श्वास घेतात.
आणी त्यांचा आत्मा ?
मूळ आणी खोड याच्या मध्ये वसतो.
म्हणूनच तर आपल्या हिंदू धर्मात वेगवेगळ्या झाडांची पण पूजा करतात ना ?
किती महान , छान , सुंदर आहे आपली संस्कृती ?
आपला देह सुंदर , सगळी सृष्टी सुंदर.
मग म्हणूनच…
मनुष्य प्राण्याने आपले संपूर्ण जीवन छान छान घालवावे.
ईश्वरी गुणगान करावे , ईश्वरी चींतन मनन भजन कीर्तन पूजन करावे.
पशुपक्षावरही प्रेम करावे. रंजल्या गांजलेल्यांना आनंद द्यावा.त्यांचे आयुष्य आनंदाने फुलवण्यासाठी किमान थोडे तरी प्रयत्न करावे.
पण काय होतंय बघा..
मनुष्य प्राणी आपले उभे आयुष्यच व्यर्थ घालवतो.
नको ते उद्योग आणी नको ते उपद्व्याप करण्यातच धन्यता मानतो.
अहो हल्ली तर स्वार्थाचा बाजारच एवढा भयंकर झालाय की , हल्ली माणसांचा वारा सुध्दा आपणास नको वाटू लागला आहे.
एकमेकांना आधार द्यायचा दूरच , घाणेरडी राजकारणं , हेवेदावे , द्वेष मत्सर एवढे टोकाचे वाढले आहेत की , विचारूच नका.
मग हे कसले ?
देह देवाचे मंदिर ?
हे तर नरकाचे द्वार…
अशी म्हणण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.
बरं… एवढं सगळं एका मनुष्य प्राण्यानेच केलंय बर का.
जागोजागी बजबजपुरी.
इतर पशुपक्षी , अगदी चौ-यांशी लक्ष योनी सुद्धा बघा बरं किती छान , आनंदाने जगताहेत ते ?
ईश्वरी नियमांचे ते अगदी काटेकोरपणे आणी तंतोतंत पालन करताहेत.
एखादा कुत्रा सकाळी सकाळी उठून दारू पित बसलाय , वाघ बिड्या फूकत बसलाय , असं कधी दिसतंय का ?
कारण त्यांना बुध्दीच दिली नाही ना देवाने ?
एका मनुष्य प्राण्याला ईश्वराने सृष्टी कल्याणासाठी बुद्धी दिली तर तो माणूस ?
नको ते उद्योग करतोय.
आणी ? नाही तो फाफटपसारा उभा करतोय.
मग हे कसलं देह देवाचे मंदिर ?
मनुष्य जन्माचा मूळ ईश्वरी उद्देश आणी मूळ प्रायोजन राहीले बाजुला ? आणी ?
लागला सगळ्यांचच जगणं मुश्किल करायला ?
अरे काय माणसा ?
कुठं चाललाय तू ?
कोण होतास तू ?
काय झालास तू ?
अरे वेड्या कसा ?
वाया गेलास तू ?
असो…
तर एकंदर काय ?
तर ? मस्त मजेत आनंदात जीवन जगावे.
दुसऱ्याच्या दुःखात संकटात धावून जावे.
एकाकी पडलेल्या एखाद्या जीवास आधार द्यावा.
अहो फक्त पैशानेच सगळी सुखे मिळतात असे नाही.
पैसा वाटला म्हणजे चांगला ? ही चुकीची धारणा समाजात कुणी रूजवली माहिती नाही.
पण जिकडे तिकडे चुकीचे पायंडेच पडलेले आपल्याला बघायला मिळतात.
एखाद्याच्या दु:खाच्या प्रसंगात खंबीर मानसिक आधार द्यायला काय पैसा लागतो का हो ?
पण अलिकडे माणसाची मनंच एवढी कोती झाली आहेत की , विचारूच नका.
मनाची श्रीमंती
हा तर कालबाह्य झालेला शब्द वाटतो.
माणसं धनाने श्रीमंत झाली पण मनाने मात्र ?
अक्षरशः भिकारी झाली ?
असल्या स्वार्थी , मतलबी समाज रचनेपुढे काय करणार ?
आणी मग त्या ?
देह देवाचे मंदिर
या उक्तीचा तरी काय उपयोग ?
अहो ,
अधर्मी , पाखंडी लोकं ,
खरा देव जरी धरतीवर देह बदलून उतरला तर ? त्याला ही पळवून लावतील.
एवढा अधर्माचा भयंकर उच्छाद मांडलाय ह्या ?
हाहाकारी , उन्मादी राक्षसांनी , हैवानांनी , सैतानांनी ?
असो…
आपल्याला काय त्याचं ?
देव त्यांच बघून घेईल.
हैवानांचा नाश कधी ? कुठं? आणी कसा करायचा हे त्याला पक्क ठाऊक आहे.
पण आपण मात्र ?
असल्या भयावह परिस्थिती मध्ये गोंधळून न जाता मस्त पैकी ईश्वरी चिंतन करून , मस्त आनंदी जीवन जगायचं.
*देह देवाचे मंदिर*
म्हणत म्हणत
हसत खेळत मस्त आनंदाने जीवन जगायचं.
आणी ? धर्म कार्य सुध्दा ? करत रहायचं.
राक्षसी माणसं ?
सुखाने जगू देत नसली तरी ?
मस्त आनंदात रहायचं.
!! *जय हरी विठ्ठल* !!
🙏🙏🕉️🚩
