50 Views

*चिमणी ? परत आलीच* *नाही…??*
✍️ २८५२

*विनोदकुमार महाजन*

🐥🐣🐥🐣

एक चिमणी…
आपल्या इवल्या इवल्याशा दोन चिमण्या पिलांना , छोट्याशा जीवांना घरट्यात सोडून ,
बाहेर गेली.
चारा आणायला.
दोन इवल्याशा जीवांना चोचीने चोचीत चारा भरायला.

दोन इवलीशी चीमणी पिलं , आई चारा घेऊन येईल म्हणून आतुरतेने तिची वाट बघत होती.
माझी आई परत येईल या आशेवर.

वेडी आशा होती त्या पिलांची.
कारण ? त्यांना तरी काय माहीत होतं की आपली आई आता परत कधीच येणार नाही म्हणून ?

त्यांची आई चारा आणायला म्हणून गेली ती परत आलीच नाही.
कधीच परत आली नाही.

दोन निष्पाप चिमणी पिलं , आपली आई येण्याची , आतुरतेने वाट बघत होती…तरी ती लेकराची माय , आई आलीच नाही.

आई कुठे गेली , कशी गेली , हे त्या चिमुकल्या लेकरांना तरी काय समजणार ? आणी कोण सांगणार ?

तिकडे ती चीमणी जाळ्यात अडकली.
एका सराईत शिका-याने अचूक जाळं लावलं ते शिकार साधायला.

काळाचंच जाळं ते ?
त्यातून एक तरी सावज कसे सुटेल ?

चीमणी जाळ्यात अडकली आणी तिचा जीव तडफडू लागला.
तिची दोन चीमणी बाळं , आईची आतुरतेने वाट पाहत असतील , हे त्या निष्पाप चीमणीला माहित होतं.
या शिका-याच्या जाळ्यातून आता तिची सुटका नव्हती.
हे तीला कळत होतं.
म्हणूनच ती तडफडत होती.
दोन लेकरांसाठी.

नियती आणी काळ पण फारच विचित्र आणी क्रूर असतात .
एकदा का कुणाची एकमेकांपासून ताटातूट झाली की ? पुन्हा भेट नाही.

कधीच नाही.

कुणी कितीही वाट पाहून पाहून तडफडत राहीलं तरी ? नियती आणी काळावर याचा कांहीही फरक पडत नाही.

अगदी असंच झालं त्या दोन पिलांच आणी ? त्यांच्या निष्पाप आईच.
दोन चीमणे जीव वाट पाहून पाहून थकले.
आईच्या वाटेकडे डोळे लावून लावून त्यांचे डोळे ही थकले.

पण चीमणी परत कधी आलीच नाही.
कधीच परत आली नाही.

कारण ?
तिला तर साक्षात काळानं , मृत्युनं तर गिळलं होतं.
मग ती परत कशी येणार होती ?

ती चीमणी आपल्या छोट्याशा पिलासाठी , निष्पाप लेकरांसाठी , त्यांना मायेने चारा भरविण्यासाठी परत कधी आलीच नाही.

आणी तिची ती दोन निष्पाप चिमणी लेकरं मात्र ? आपली आई आज परत येईल , उद्या परत येईल , आपल्याला मायेची ऊब देईल , मायेने दोन घास भरवील , म्हणून मोठ्या आशेने दररोज वाट बघत होती.

वेड्या आशेने.
पण ? ती चीमणी परत कधी आलीच नाही.
पण ती निष्पाप बाळं मात्र ? आपल्या आईची , ती माय परत येण्याची , अजूनही आतुरतेने वाट बघताहेत.
( सगळ्या अनाथ चिमण्या लेकरांना व वेड्या जीवांना समर्पित )

*श्रीकृष्णार्पणमस्तू…*

🐣🐥🐣🐥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!