27 Views

*वेडी आशा , वेडं प्रेम…* ???
✍️ २८३६

*विनोदकुमार महाजन*

🩷🌹🩷🌹

आशा ही नेहमीच वेडी असते आणी प्रेम ही नेहमी वेडं असतं.
खरंखुरं प्रेम…

म्हणूनच तर प्रत्येक जण वेड्या आशेवर जगत असतो.जी वेडी आशा आयुष्यात कधीच पूर्ण होणारी नसते.आणी बहुधा ? कुणावर ना कुणावर तरी वेडं प्रेम करतच असतो.

वेडी आशा आणी वेडं प्रेम बहुधा आयुष्यात कधीच पूर्ण होत नसावं.

तरीही माणूस आशावादी असतोच.
एक वेडं स्वप्न आणी ?
एक वेडं प्रेम ह्रदयात घेऊन जगतं असतो .

तसं तर सगळेच जण कुणावर ना कुणावर अगदी खरं खुरं प्रेम करत असतातच की हो.
अगदी पशुपक्षी सुद्धा.

चिमण्या कावळे सुध्दा एकमेकावर , आपल्या परिवारावर , आपल्या छोट्या छोट्या पिल्लावर , मनस्वी प्रेम करत असतात .
फक्त आपली संवेदना जागृत असली की आपल्याला पशु पक्षांचे प्रेमही कळते.

नात्तागोत्यातही संवेदना जागृत असेल तर ते टिकते , नाहीतर ?
असो…

संवेदना जागृती… पशुपक्षातही असते .

त्याचं होतं काय की…
लग्नापूर्वी बरेच जण , एकमेकावर खरे प्रेम करत असतात .
अगदी दोघे ही लग्नाच्या आणाभाका ही घेतात.
पण नियतीच्या मनात दुसरंच असतं.

दोघांचेही दुसरेकडेच लग्न जमतात.आणी दोघेही पहिल्या आणाभाका विसरून नवीन आयुष्याची सुरुवात करतात.

” *सागरात होते दोन* *ओंडक्यांची भेट , एक* *लाट तोडी त्यांना* *पुन्हा नाही* *गाठ…”*
या उक्तीप्रमाणे दोघेही कायमचे वेगळे होतात.
आयुष्यात पुन्हा कधिही न भेटण्यासाठी.

कदाचित पुन्हा भेटण्याची एक वेडी आशा आणी एक हुरहुर घेऊन.

साहजिकच आहे.मनुष्य जन्म आहे.
दोन मनं जुळली की नाती जुळतात.
आणी एक लाट त्यांना कायमचीच तोडून टाकते.

अगदी चिमण्या कावळे सुध्दा एकमेवर असेच प्रेम करत राहतात.
आयुष्यभरासाठी.

आमच्या गॅलरीत नेहमी अनेक पक्षी येतात.
चिमणा चिमणी.
कबुतराची जोडी.
खंड्या पक्षी.
साळुंखी जोडी.

साळुंखी जोडी घरात येणं म्हणजे साक्षात लक्ष्मी नारायणाचा जोडा घरात येणं.
गॅलरीत नेहमी एक कावळ्याची जोडी सुध्दा यायची.
दोघेही आमच्या कडून अगदी हक्काने भांडून , खायला मागून घ्यायचे.खायला देत नाही तोपर्यंत मोठमोठ्याने ओरडत रहायचे.

खायला देण्यासाठी सांळुख्या जोरजोरात ची..ची..ची… करून ओरडतात.
तर चिमण्यांचा सतत चिवचिवाट चालू असतो.

त्यातला कावळा , त्याच्या कावळीला , अगदी प्रेमाने , माझ्या समोर व माझ्या पत्नी समोर , तो कावळा कावळीच्या , चोचित चोच घालून घास भरवायचा.
आम्ही आश्चर्यचकित होऊन बघत रहायचो .

पण अलिकडे काय व्हायला लागलं की…?
तो कावळा अगदी एकटाच यायचा.सतत
काव काव काव…करून ओरडत रहायचा.
अगदी वेड्या नजरेने आणी वेड्या आशेने तो त्याच्या कावळीला भिरभिरत्या नजरेने सगळीकडे शोधत रहायचा.
कधी कधी त्याच्या तोंडात काविळीचे एक पंखही असायचे.
खाण्याकडे ही त्याचे लक्ष नसायचे.

बहुदा त्या कावळीचा मृत्यू झाला असावा व तो कावळा, कावळीच्या शोकाकुलतेने असे ओरडत असावा , असे मला वाटले.

कारण पशुपक्षी सुद्धा आपापले आयुष्य भराचे जोडीदार निवडतात.आयुष्यभर प्रेमाने एकत्र राहतात.एकमेकावर खरे प्रेम करतात.

पोपट मैनेचे प्रेम आपण बघितले असेलच.

तो कावळा जेंव्हा एकटा यायचा आणी सैरभैर होऊन सतत ओरडत राहून कांहीतरी शोधायचा … त्यावेळी मला जाणवले की…
त्याची कावळी त्याला कायमची सोडून निघून गेली आहे.

म्हणून तो कावळा वेडा होऊन , तिचा पंख चोचित घेऊन फिरत असायचा .
माझी कावळी परत येईल ही त्याची
*वेडी आशा.*
असावी.

*वेडं प्रेम त्या कावळ्याचं.*
पण ती तर ? कायमचीच काळाच्या पडद्याआड गेली आहे..हे त्या बिचाऱ्याला काय माहीत असणार ?

” *एक लाट तोडी त्यांना* *पुन्हा नाही* *गाठ…! “*

असाच एक चिमणा आपल्या एका छोट्याशा पिलाला बरोबर घेऊन यायचा आणी त्याला , त्या निरागस पिलाला मायेने आपल्या चोचितून घास भरवायचा.
कदाचित त्याची आई , त्याला मायेने घास भरवणारी त्याची चिमणी सुद्धा त्याला सोडून गेली असावी.
म्हणून चिमणा… एक बाप…पिलाला किती मायेने घास भरवत होता…?

पशुपक्षी सुद्धा आपल्या अपत्यावर किती निरागस प्रेम करत असतात ना ?

कदाचित त्यातही एखादा क्रूर हिरण्यकश्यपू असु शकेल…का ? असे मला उगीचच वाटले…
*त्या निष्पाप चिमण्या* *पिलाची आई* *आधीच गेली* *होती…* *नियतीने* *आधिच त्याचा एक पंख* *कापला होता…*
*कदाचित तो क्रूर चिमणा* *बापही ? त्या* *निष्पाप लेकराचा* , *चिमणीच्या* *पिलाचा ?* *दूसरा* *पंखही उपसून काढेल ?*
*आणी त्याच्या पदरातलं* *अन्नही* *हिसकावून घेईल ??*
*आणी …*
ते *दोन्ही पंख कापलेलं* *एकटं बिचारं* *चिमणं* *पिलू…?* *येडं आणी* *सैरभैर होऊन* *आधार शोधत* *फिरत* *असावं…?*
*आईची वेडी माया* *शोधत…?*

*काय ठावे…??*

शेवटी काय तर…
*वेडी आशा…वेडं प्रेम…*

अमरनाथचा *कबुतराचा* *जोडा ही* कदाचित असाच अजरामर झाला असावा.

*मुहब्बत जींदा रहती है*
*मुहब्बत मर नहीं सकती*

*उमा महेश्वर की जय*
*हर हर महादेव…*

🙏🩷🩷🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!