61 Views

*भक्तिमार्ग सर्वश्रेष्ठ…!!*
✍️ २८५७

*विनोदकुमार महाजन*

🌹🌹🌹🌹

ईश्वर भक्तीचे आणी ईश्वर प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत.

कर्म मार्ग , भक्ती मार्ग , योग मार्ग आणी ज्ञान मार्ग.

कर्म मार्गामध्ये ईश्वर प्राप्तीचे कर्म करत असणे , हेच मुख्य साधन असते.
योग मार्गामध्ये यौगिक क्रिया महत्वपूर्ण असतात.
तर ज्ञानमार्मामध्ये ज्ञान साधनेतून ईश्वर प्राप्ती सांगीतली जाते.
आणी भक्ती मार्गामध्ये
ईश्वरावरील अतूट श्रध्दा , भक्ती , प्रेम याला विशेष महत्त्व असते.

कर्म मार्ग, योग मार्ग , ज्ञान मार्ग यामध्ये साधारणतः अनेक बंधने पाळून , अनेक अडथळे पार करून , ईश्वर प्राप्ती करावी लागते.
पण भक्ती मार्गामध्ये कसल्याही प्रकारची बंधने पाळण्याची सहसा गरज नसते.

ईश्वराच्या चरणावरती सदैव संपूर्ण समर्पण हाच भक्ती मार्गाचा मुख्य पाया असतो.
स्वतःचे अस्तित्व विसरून भगवंतावर प्रेम करणे व संपूर्णतः ईश्वराचेच होऊन जाणे ,
स्वतः चे सुखदुःख विसरून , स्वतःचे अस्तित्व विसरून, ईश्वराला संपूर्णपणे शरण जाऊन जे प्रेम निस्सिम , निस्वार्थी भावनेने ईश्वरावर केले जाते , तीच भक्ती आणी तोच भक्ती मार्ग होय.

सुख असो अथवा दुःख ,
सदैव ईश्वर माझा सांगाती…ही भावना भक्ती मार्गामध्ये उच्च कोटिची अनुभूती देत राहते.

चालता बोलता , उठता बसता , खाता पिता , जागेपणी झोपेत सुद्धा ,
अखंड ईश्वरी चींतन मनन स्मरण , भक्ती मार्गामध्ये श्रेष्ठ असते.

देव तर याच ख-या भावाचा आणी प्रेमाचा भुकेला असतो.
म्हणूनच तर तो प्रत्येक संतांच्या सुखदुःखात आनंदाने धावून जातो.

भक्ती मार्गामध्ये देवाकडून भक्त कधीही व कसलीही अपेक्षा ठेवत नाही.
*ठेवीले अनंते तैसे ची* *रहावे*
ही मनाची उच्चतम व आनंदी भावना सदैव राहते.

राम कृष्ण हरी
जय जय
राम कृष्ण हरी…
हा मंत्र म्हणूनच तर भक्ती मार्गामध्ये सर्वश्रेष्ठ समजला जातो.व हा मंत्र तारक मंत्र पण आहे.

अनेक सिध्दींचे साधन म्हणजे… अखंड
राम कृष्ण हरी मंत्र जप होय…

म्हणूनच तर इतर मार्गापेक्षा भक्ती मार्ग हा सहज व सोपा होय .

*जय जय राम कृष्ण हरी*

🙏🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!