46 Views

*वसकावसकी…!*?
✍️ २८७८
*विनोदकुमार महाजन*
🤫🤫🤔🫣
मित्रांनो ,
हल्ली समाजात बहुतेक एक नवीनच नातं निर्माण होतं चाललंय.
वसकावसकीचं.
एकमेकांच्या अंगावर वसकण्याचं , खेकसण्याचं एक अनाकलनीय आणी अद्भूत नाते ?
ह्यानं त्याच्या अंगावर वसकायचं ? त्यानं याच्या अंगावर वसकायचं.
ह्यानं त्याच्या अंगावर खेकसायचं ? त्यानं ह्याच्या अंगावर खेकसायचं.
जिकडे तिकडे वसकावसकी अन् खेकसाखेकसी ?
अजीब रसायन झालंय रे देवा समाजात ?
आता सगळीकडेच , घरोघरीच हा भयंकर रोग पसरला आहे की काय ? माहिती नाही.पण समाजात आज बव्हंश ठिकाणी हाच प्रकार बघायला मिळतो आहे.
एकमेकांचा विनाकारण पानउतारा करणे.
अहो ,
कुणी कुणाला नीट बोलायला , कुणी कुणाला समजावून घ्यायलाच तयार नाही.
जो तो फूल्ल टेन्शन मध्ये अथवा फूल्ल अहंकाराच्या झोनमध्येच सवार दिसतोय.
आणी दोन्हीकडून ही हमरा तुमरी चालू झाली की मग ?
नात्यात एक ” विशेष बहार ” येते आणी मग ?
अख्खे जीवन गाणेच रडगाणे होऊन जाते.
जीवनातला सगळा रंग रागच जणू निघून जातो.आणी बेरंग , बेसूर आयुष्य होऊन बसते.
” घरोघरी मातीच्या चुली ? ” आहेत का हो ?
माहित नाही.
पण बहुधा हे रडगाणे ब-याच ठिकाणी चालू असावे.
कुणी एकमेकांना समजावून घ्यायला , कुणी दुस-याच्या मताला कींमत द्यायला , दुस-याला मोठेपणा द्यायला कुणी तयारच दिसत नाही.
भलतंच घडायला लागलंय बूवा या देशात ?
विशेषतः अनेक नवरा बायकोच्या नात्यात ?
जिकडे तिकडे हमरी तुमरी ?
आणी मग ?
घटस्फोटाचे मॅटर ?
सुसंस्कृत समाजाला हल्ली काय झालंय तेच समजेनासं झालंय बाबा.
समजूतदार पणा दाखवावा तर ? आतल्या आत कुढत बसाव लागतंय.
बरं , त्या कुढत बसण्याला ही कांहीच अर्थ रहात नाही हो.
हे म्हणजे अगदी आयुष्यभराचं दुखणं आणी ? त्यातून घडत असणा-या असहाय तडजोडी.
आता प्रत्येक घरातचं हे असं आक्रीत , विपरीत ? घडतंय असं मी मुळीच म्हणत नाही.
अगदी सुखी समाधानी , आनंदाने जगणारी , एकमेकांना समजावून घेणारी मस्त कुटुंबे असतील ही कदाचित.
पण ? बहुधा विरळाच.
टोकाचा समजूतदारपणा ही घात करतो आणी ? टोकाचा भांडकुदळेपणाही घात करतो.
मग जगायचं तरी कसं ?
आनंदाने जगणं तर ? जवळ जवळ दुरापास्तच होत चाललंय का .?
कटकटी नको म्हणून घेतलेली मनाची सपशेल माघार ? कधितरी कामी येतेच.पण सहनशीलतेचा ही अंत झाला की ? स्फोट होतो आणी रूपांतर ? भयंकर विस्फोटात होते.
दोन्ही बाजूकडून समजुतदारपणाचा अभाव , हे संघर्षाचं कारण असू शकेल.
समजूतदार पणा हा सगळ्या समस्येवर उत्तर ही असेल.पण ? समजूतदार पणाचाही अंत झाला की स्फोट हा होणारचं ना ?
अगदी खरं सांगू का ? आजकाल समाजात मनाचे मोठेपण वगैरे शब्द अगदीच ठिसूळ झाल्यासारखे वाटतायत.
अगदीच स्थितप्रज्ञ होऊन अथवा स्थितप्रज्ञ राहून , परिस्थिती वर मात करणे सगळ्यांनाच शक्य नसते.
सामान्य माणसं कसं काय स्थितप्रज्ञ राहू शकणार ?
हल्ली भल्याभल्यांच्या मेंदूचा भडका अगदी सहजासहजी होताना आपण पहातोय.
तिथं कसली आलीय स्थितप्रज्ञता ?
आणी समजा एखादा स्थितप्रज्ञ असेलही.
पण त्याचा तरी काय उपयोग ?
बोलत का नाही म्हणून त्यालाही मारून टाकतील ? कांही कृतघ्न लोग…?
तडजोडी वर तडजोडी करून जेंव्हा मन कंटाळतं तेंव्हा ?
मनाची उबग नावाचा भलताच प्रकार चालू होतो.
आणी त्यातूनही भलतंच आक्रीत घडायला लागतं.
कधी कधी भांडणात माघार जशी अंगलट येते तर ? कधी कधी आक्रमक पणा ही घात करतो.
संयमाचा बांध फूटणे , शांती भंग पावणे ?
असले प्रकार सुध्दा ब-याच ठिकाणी पहायला मिळतात.
पण अलिकडे समाजात हे असं विचित्र का घडतंय तेच कळेनासे झाले आहे.
असो…
यावर एकच तोडगा
तो म्हणजे ?
गुरूत्वमध्य काढून ?
छान मस्त आनंदी जीवन जगायचं.
प्रेम , समजूतदारपणा जिथं सपशेल फेल जातो तीथं तडजोड कामाला येते.
तुम्ही म्हणाल ?
अहो तडजोडीला ही कांही अंत असतो का नाही ?
” जीवन इसी का नाम है प्यारे… यहाँ सबकुछ अलबेल करके ही जीना पडता है ! ”
*श्रीकृष्णार्पणमस्तू…*
🕉️🕉️🕉️🕉️
