7 Views

*हेकट राजा ? परेशान* *प्रजा ??*
✍️ २८७५
*विनोदकुमार महाजन*
——————–
प्रत्येक घरात ,
हेकट , तापट , अविचारी
व्यक्ती असू शकतो का ?
मनमानी करणारा ?
हम करे सो कायदा म्हणत , सगळ्यांना त्रास देणारा , दुसऱ्यांच्या मनाचा, मताचा विचार न करता आपली खोटी असली तरी , हेकट मते दुसऱ्यावर सक्तीने लादणारा ?
एखादा भयंकर क्रूर ?
हुकूमशहा एखाद्या घरात असू शकतो का ?
होय ,
असू शकतो.
अशा हेकट , तर्कटी माणसांमुळे अनेक जणांची आयुष्य सुध्दा उध्वस्त होऊ शकतात.
अनेक कुटुंबे बरबाद होऊ शकतात.
पण अशा तर्कटी माणसांना याच्याशी कांहीही घेणंदेणं नसतं.
एखादा हेकट माणसाच्या मानसिक त्रासाला कंटाळून तडफडून मरून जरी पडला तरी ?
अशा पाषाण ह्रदयी माणसांवर कांहीही फरक पडत नाही.
आणी अशा ?
हेकेखोर माणसाचा विरोध करायचा सोडून कोणी त्यालाच देवदूत समजून पुजत असेल तर ? नक्कीच हे भयावह आहे , नाही का ?
अशी समाजात भरपूर उदाहरणे असू शकतील.
आणी जर ?
राजाच हेकट , तर्कटी , मूर्ख , अहंकारी असेल तर ?
अख्या प्रजेचीच वाट लागते.
एकपट राजा ,
चौपट प्रजा…अशी दयनीय अवस्था त्या समाजाची आणी देशाची होते.
स्वातंत्र्य प्राप्ती नंतर अनेक बर्ष आपल्या देशात काय बरं घडलं.
ईश्वर निर्मित आदर्श सनातन संस्कृतीला आणी संपूर्ण समाजाला बरबाद करण्याचं भयंकर विनाशकारी षड्यंत्र रचले गेले का ?
विचार करा म्हणजे ?
उत्तर सापडेल !
*हर हर महादेव*
🤫🤔🤔🤔
